लॉकडाऊनमध्ये ईपीएफच्या 36 लाख क्लेममधून 11,500 कोटींची सेटलमेंट

वृत्तसंस्था
Tuesday, 9 June 2020

लॉकडाऊनचे निर्बंध असतानाही ईपीएफओने एकूण 36.02 क्लेमद्वारे 11,540 कोटी रुपयांचे भूगतान एप्रिल आणि मे या दोन महिन्यात केले आहे, अशी माहिती कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने दिली आहे. एकूण 36.02 क्लेमपैकी 15.54 लाख क्लेमद्वारे 4,580 कोटी रुपयांचे भूगतान करण्यात आले. हे 15.54 लाख क्लेम कोविड-19च्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या प्रधान मंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत करण्यात आले होते.

एप्रिल आणि मे महिन्यात कोविड-19 महामारीचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीत कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमधून (ईपीएफओ) 11,540 कोटी रुपयांचे क्लेम पूर्ण करण्यात आले आहेत. ईपीएफओने आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करत हे क्लेम पूर्ण केलेले आहेत. 

लॉकडाऊनचे निर्बंध असतानाही ईपीएफओने एकूण 36.02 क्लेमद्वारे 11,540 कोटी रुपयांचे भूगतान एप्रिल आणि मे या दोन महिन्यात केले आहे, अशी माहिती कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने दिली आहे. 

  अमेरिका महामंदीच्या विळख्यात अडकण्याची शक्यता

एकूण 36.02 क्लेमपैकी 15.54 लाख क्लेमद्वारे 4,580 कोटी रुपयांचे भूगतान करण्यात आले. हे 15.54 लाख क्लेम कोविड-19च्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या प्रधान मंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत करण्यात आले होते.

कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर पीएफधारकांना त्यांचे तीन महिन्यांचे मूळ वेतन आणि डीए किंवा त्यांच्या पीएफ खात्यात जमा असलेल्या रकमेपैकी 75 टक्के रक्कम काढता येणार आहे. यातील जी रक्कम कमी असेल ती रक्कम काढता येणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

लॉकडाऊन काळात भविष्य निर्वाह निधीमधून रक्कम काढणाऱ्यांपैकी 74 टक्के क्लेम हे 15,000 रुपयांपेक्षा कमी वेतन असणाऱ्या गटातील होते. 50,000 रुपयांपेक्षा जास्त वेतन असणाऱ्या गटातील क्लेम फक्त 2 टक्के इतकेच होते. तर जवळपास 24 टक्के क्लेम हे 15,000 ते 50,000 रुपयांदरम्यान वेतन असणाऱ्या गटांमधील होते, अशी माहिती ईपीएफओने दिली आहे. 

'टर्म इन्श्युरन्स', आर्थिक नियोजनाचा महत्त्वाचा खांब

कोविड-19च्या जवळपास एकूण क्लेमपैकी 54 टक्के क्लेम हे ऑटो मोड द्वारे करण्यात आले आहेत. ऑटोमेशन आणि मनुष्यबळाद्वारे ईपीएफओ प्रतिदिनी जवळपास एकूण 270 कोटी रुपयांचे 80,000 पेक्षा अधिक क्लेम सेटल करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: EPFO settles 36 claims worth Rs.11,500 crore