esakal | अमेरिका महामंदीच्या विळख्यात अडकण्याची शक्यता
sakal

बोलून बातमी शोधा

US economy

अमेरिकी अर्थव्यवस्थेला गेल्या सात दशकांतील सर्वाधिक काळ चालणाऱ्या महामंदीचा सामना करावा लागण्याची शक्यता अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. "नॅशनल असोसिएशन फॉर बिझनेस इकॉनॉमिक्स'ने (एनएबीई) केलेल्या सर्वेक्षणातून निष्कर्ष  काढण्यात आला आहे. अर्थतज्ज्ञांच्या मते, कोरोना संकट पुन्हा निर्माण होण्याची शक्यता असून अमेरिकेत पुन्हा संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. वाढत्या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अर्थव्यवस्थेला पुन्हा एकदा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

अमेरिका महामंदीच्या विळख्यात अडकण्याची शक्यता

sakal_logo
By
वृत्तसंस्था

"जीडीपी'त 1946 नंतर मोठी घसरणीची शक्यता


जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेमध्ये चालू वर्षात महामंदी येण्याची शक्यता आहे. अमेरिकी अर्थव्यवस्थेला गेल्या सात दशकांतील सर्वाधिक काळ चालणाऱ्या महामंदीचा सामना करावा लागण्याची शक्यता अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.  "नॅशनल असोसिएशन फॉर बिझनेस इकॉनॉमिक्स'ने (एनएबीई) केलेल्या सर्वेक्षणातून निष्कर्ष  काढण्यात आला आहे. 

अर्थतज्ज्ञांच्या मते, कोरोना संकट पुन्हा निर्माण होण्याची शक्यता असून अमेरिकेत पुन्हा संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. वाढत्या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अर्थव्यवस्थेला पुन्हा एकदा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

सोन्यातील गुंतवणूक, एक सोनेरी पर्याय

महामंदीच्या वाटेवर अमेरिका

"एनएबीई'ने केलेल्या सर्वेक्षणाचा निकाल सोमवारी  जाहीर करण्यात आला. जगभरात कोरोना संकट पुन्हा गडद होण्याची शक्यता आहे. विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील एकूण देशांतर्गत उत्पादनात (जीडीपी) वर्ष 2020 मध्ये 5.9 टक्क्यांची घसरण होण्याची शक्यता आहे. वर्ष 1946 नंतरची ही सर्वात मोठी घसरण ठरण्याची भीती  
"एनएबीई' व्यक्त केली आहे. अमेरिकी अर्थव्यवस्था महामंदीच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या काळात अमेरिकेच्या "जीडीपी'त 11.6 टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली होती. "एनएबीई'च्या 48 अर्थतज्ज्ञांच्या समूहाने दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी ते मार्च या तिमाहीत अमेरिकेच्या "जीडीपी'त पाच टक्के घसरण होण्याची शक्यता असून त्यानंतरच्या एप्रिल ते जून या तिमाहीत ही घसरण 33.5 टक्क्यांपर्यंत होईल.

दुसरी सहामाही आशादायी
"एनएबीई'च्या अर्थतज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्ष 2020च्या दुसऱ्या सहामाहीत वृद्धीदरात वाढ होण्याची शक्यता आहे. जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत वृद्धी दर 9.1 टक्के आणि ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत वृद्धी दर 6.8 टक्के राहण्याची आशा आहे. तर वर्ष 2021मध्ये अमेरिकेचा वृद्धी दर 3.6 टक्के राहण्याची शक्यता आहे.

 म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना टाळा 'ह्या' चूका

बेरोजगारीचा उच्च दर

अमेरिकेत बेरोजगारीचा दर उच्च पातळीवर पोचला असून एप्रिल महिन्यात तो 14.7 टक्क्यांवर पोचला आहे. या महिन्यात 2.05 कोटी लोक बेरोजगार झाले. यावरून लक्षात येईल की, अमेरिकी अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला असून अमेरिकेतील उद्योग मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाले आहेत.