esakal | इक्विटी म्युच्युअल फंडातील गुंतवणूकीत २७ टक्के घट
sakal

बोलून बातमी शोधा

Mutual-Funds

इक्विटी प्रकारातील म्युच्युअल फंड योजनांमध्ये २०१९-२० या आर्थिक वर्षात ८१,६०० कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. इक्विटी योजनांमधील गुंतवणूक २७ टक्क्यांची घट झाली आहे. त्याआधीच्या आर्थिक वर्षात इक्विटी म्युच्युअल फंडात १.१२ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती.

इक्विटी म्युच्युअल फंडातील गुंतवणूकीत २७ टक्के घट

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

* २०१९-२० मध्ये झाली ८१,६०० कोटींची गुंतवणूक
* मार्च महिन्यात ११,४८५ कोटी रुपयांची गुंतवणूक 
* २०१८-१९ या आर्थिक वर्षात या प्रकारात १,११,८५८ कोटी रुपयांची गुंतवणूक

इक्विटी प्रकारातील म्युच्युअल फंड योजनांमध्ये २०१९-२० या आर्थिक वर्षात ८१,६०० कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. इक्विटी योजनांमधील गुंतवणूक २७ टक्क्यांची घट झाली आहे. त्याआधीच्या आर्थिक वर्षात इक्विटी म्युच्युअल फंडात १.१२ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाने (अॅम्फी) यासंदर्भातील आकडेवारी जाहीर केली आहे. २०१८-१९ या आर्थिक वर्षाच्या तुलनेत २०१९-२० या आर्थिक वर्षात इक्विटी फंडांमधील गुंतवणूकीत घट झाली आहे. इक्विटी बाजारातील अस्थिरतेमुळे नव्याने इक्विटी प्रकारात गुंतवणूक करण्यासंदर्भात गुंतवणूकदारांनी सावध पावित्रा घेतल्याचा हा परिणाम आहे.

अॅम्फीच्या आकडेवारीनुसार ईएलएसएसमध्ये ८१,६०० कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. तर २०१८-१९ या आर्थिक वर्षात या प्रकारात १,११,८५८ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. या प्रकारात २०१७-१८ या वर्षात १,७१,०६९ कोटी रुपये, २०१५-१६ मध्ये ७४,०२४ कोटी रुपये आणि २०१४-१५ मध्ये ७१,०२९ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. मात्र २०१३-१४ या आर्थिक वर्षात या प्रकारच्या योजनांमधून गुंतवणूकदारांनी ९,२६९ कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली होती.

किशोरवयीन युवकाच्या स्टार्टअपमध्ये रतन टाटांची ५० टक्के गुंतवणूक

२०१९-२० या आर्थिक वर्षातील एकूण गुंतवणूकीपैकी ११,४८५ कोटी रुपयांची गुंतवणूक मार्च महिन्यातच झाली आहे. वर्षभरातील ही सर्वात उच्चांकी गुंतवणूक होती. तर फेब्रुवारीमध्ये गुंतवणूकदारांनी १०,७३० कोटी रुपये इक्विटी प्रकारात ओतले होते. कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या प्रचंड मोठ्या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर ही गुंतवणूक झाली आहे. 

मार्च २०२० अखेर इक्विटी म्युच्युअल फंडातील एकूण गुंतवणूक घटून ६.०३ लाख कोटी रुपयांवर आली आहे. मार्च २०१९ अखेर इक्विटी फंडातील एकूण गुंतवणूक ७.७३ लाख कोटी रुपये इतकी होती. त्याचबरोबर एसआयपीद्वारे केल्या गुंतवणूकीत मात्र वाढ होत ती १ लाख कोटी रुपयांवर पोचली आहे. २०१८-१९ या आर्थिक वर्षात ९२,६९३ कोटी रुपये गुंतवणूक एसआयपीद्वारे झाली होती. 

सरलेल्या आर्थिक वर्षात दर महिन्याला सरासरी ९.९५ लाख एसआयपी खात्यांची भर पडली आहे. प्रत्येक एसआयपी खात्याद्वारे होणारी सरासरी गुंतवणूक २,७५० रुपये इतकी आहे.