कोरानाची ऐशीतैशी! भारतीयांनी तोडला सोने खरेदीतील दहा वर्षांचा रेकॉर्ड! | Arthavishwa | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gold
कोरानाची ऐशीतैशी! भारतीयांनी तोडला सोने खरेदीतील दहा वर्षांचा रेकॉर्ड!

Covidची ऐशीतैशी! भारतीयांनी तोडला सोने खरेदीत दहा वर्षांचा रेकॉर्ड!

सोने वापराच्या बाबतीत भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. देशात सर्वाधिक सोने (Gold) हे विदेशातून आयात केले जाते. भारताने 2021 या वर्षात सोने आयात (Gold Import) करण्याचा 10 वर्षांचा जुना विक्रम (Record) मोडला आहे. भारताने 1,050 टन सोने आयात केले, ज्यावर एकूण $55.7 अब्ज खर्च झाले. हा आकडा मागील वर्षाच्या तुलनेत दुप्पट आहे, तर 2011 नंतरचा हा उच्चांक आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीमुळे (Covid-19) $23 बिलियनपेक्षा कमी किमतीचे सोने आयात करण्यात आले. (Even during the Corona period, Indians broke the ten-year record of gold purchases)

हेही वाचा: Covid Returns! लहान मुले, को-मॉर्बिड, गर्भवतींची घ्या 'अशी' काळजी

आकडेवारीनुसार, 2020 मध्ये भारतात सुमारे 430 टन सोने आयात करण्यात आले. त्याची एकूण किंमत $22 अब्ज होती. त्याच वेळी, 2011 मध्ये परदेशातून $ 53.9 अब्ज किमतीचे सोने खरेदी करण्यात आले. भारताने 2020 मध्ये जगातील 30 देशांमधून 377 टन सोन्याच्या बार आणि बिस्किटांची (Gold Biscuits) आयात केली.

यामुळे वाढली विक्रमी मागणी

वर्ल्ड गोल्ड कौन्सिल (World Gold Council - WGC) सीईओ (भारत) सोमसुंदरम पीआर (Somasundaram PR) म्हणतात, की 2021 मध्ये परिस्थिती सुधारल्यामुळे सणासुदीच्या आणि लग्नाच्या हंगामात (Wedding Season) दागिन्यांची मागणी वाढली आहे, ज्याची पूर्तता करण्यासाठी व्यापाऱ्यांनी अधिक सोने आयात केले. गेल्या ऑक्‍टोबर आणि नोव्हेंबरमध्ये सणासुदीच्या काळात भारतीयांनी मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी केल्याचे डब्ल्यूजीसीच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. यानंतर लग्नसराईच्या गर्दीच्या काळातही सोन्याची विक्री वाढली आहे. भारताने डिसेंबरमध्ये 86 टन सोने आयात केले, जे गेल्या वर्षीच्या 84 टनांच्या तुलनेत किंचित जास्त आहे.

2020 मध्ये कमी आयात

वर्ल्ड गोल्ड कौन्सिल (WGC) च्या मते, लॉकडाऊनमुळे (Lockdown) 2020 मध्ये सोन्याची आयात सर्वात कमी होती. लग्नाच्या मोसमात सोन्याची मागणी सर्वाधिक असते, पण कोरोनामुळे लग्न 2021 पर्यंत पुढे ढकलण्यात आले. त्याचा थेट परिणाम सोन्याच्या आयातीवर झाला. यावर्षी 23 अब्ज डॉलरपेक्षा कमी किमतीचे सोने आयात करण्यात आले. ऑगस्ट 2020 मध्ये स्थानिक सोन्याच्या किमतीने 56,191 रुपये प्रति 10 ग्रॅमचा विक्रमी उच्चांक गाठला होता. 2021 मध्ये परिस्थिती सुधारली आणि वर्षाच्या सुरुवातीला भारतातील किरकोळ ग्राहकांसाठी सोने अधिक परवडणारे राहिले.

हेही वाचा: सर्व आरोग्य विमा पॉलिसींनी भरावा ओमिक्रॉन उपचाराचा खर्च : IRDAI

2022 मध्येही वाढू शकते आयात

बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जानेवारीमध्ये सोन्याची आयात कमी होऊ शकते, कारण कोरोनाच्या नवीन Omicron व्हेरिएंटमुळे अनेक शहरांमध्ये निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यामुळे ज्वेलर्सनी सोन्याची खरेदी कमी केली आहे. मात्र, त्याचा परिणाम सुरुवातीच्या काही महिन्यांतच दिसून येऊ शकतो. त्याच वेळी, सोमसुंदरम म्हणाले की, सध्याचे बाजार संकेत पाहता, 2022 मध्ये सोन्याची आयात या वर्षाच्या तुलनेत अधिक जास्त होईल अशी अपेक्षा आहे.

भारत हा दुसरा सर्वात मोठा आयातदार

सोने वापराच्या बाबतीत भारताचा (India) जगात दुसरा क्रमांक लागतो. देशात सर्वाधिक सोने हे विदेशातून आयात केले जाते. एकूण सोन्याच्या आयातीपैकी 44 टक्के सोने स्वित्झर्लंडमधून (Switzerland) आणि 11 टक्के संयुक्त अरब अमिरातीमधून (United Arab Emirates) खरेदी केले जाते. गेल्या काही वर्षांतील कोणत्याही आर्थिक वर्षातील तिसऱ्या तिमाहीतील सोन्याच्या आयातीच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास, 2014-15 मध्ये ऑक्‍टोबर ते डिसेंबर या कालावधीत 339.3 टन सोने आयात करण्यात आले होते.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top