
अमेरिकेतील सोशल मीडिया कंपनी फेसबुकने भारतातील आघाडीची दूरसंचार कंपनी असलेल्या रिलायन्स जिओमध्ये 43 हजार 574 कोटी रूपयांची गुंतवणूक केली आहे. आता फेसबुकची रिलायन्स जिओमध्ये 9.99 टक्के हिस्सेदारी आहे.
मुंबई : अमेरिकेतील सोशल मीडिया कंपनी फेसबुकने भारतातील आघाडीची दूरसंचार कंपनी असलेल्या रिलायन्स जिओमध्ये 43 हजार 574 कोटी रूपयांची गुंतवणूक केली आहे. आता फेसबुकची रिलायन्स जिओमध्ये 9.99 टक्के हिस्सेदारी आहे.
बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
फेसबुकचा भारतात आणखी मोठ्या प्रमाणावर विस्तार करण्यासाठी भारतातील सर्वात मोठी डिजिटल कंपनी रिलायन्स जिओ सोबत करार केला आहे. रिलायन्स जिओमध्ये फेसबुकने 43 हजार 574 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे, अशी फेसबुकने बुधवारी मोठी घोषणा केली.
जिओने चार वर्षांहून कमी कालावधीत 38.8 कोटींहून अधिक लोकांना ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आणले आहे. यामुळे जिओच्या माध्यमातून आम्ही भारतात पहिल्यापेक्षा अधिक लोकांशी जोडण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही फेसबुकने सांगितले. या करारामुळे फेसबुक आता रिलायन्स जिओमध्ये सर्वात मोठी भागधारक कंपनी ठरली आहे. वर्ष 2016 मध्ये रिलायन्स जिओने दूरसंचार क्षेत्रात पाऊल टाकले. तसेच स्वस्त सेवा देत आज आघाडीची कंपनी आहे.