Facebook Meta : जागतिक मंदीकडे वाटचाल? मेटाने दिला 11,000 हून अधिक कर्मचाऱ्यांना नारळ

मेटाचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी आज एका ब्लॉग पोस्टमध्ये ही माहिती दिली
CEO Mark Zuckerberg
CEO Mark Zuckerbergesakal

फेसबुकची मूळ कंपनी मेटाने 11,000 हून अधिक कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. Facebook ची मूळ कंपनी Meta Platforms Inc. ने बुधवारी त्यांच्या कंपनीतील कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहेत. कंपनीच्या महसुलात घट झाल्यानंतर सोशल मीडिया कंपनीने ही कारवाई केली आहे. मेटाचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी आज एका ब्लॉग पोस्टमध्ये सांगितले की, मी मेटाच्या इतिहासातील सर्वात कठीण निर्णय घेत आहे. मी माझ्या टीमचा सुमारे 13% भाग कमी करण्याचा आणि आमच्या 11,000 हून अधिक प्रतिभावान कर्मचाऱ्यांना कंपनीमधून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

झुकरबर्ग म्हणाले, "आम्ही खर्चात कपात करून अधिक कार्यक्षम कंपनी बनण्यासाठी अनेक अतिरिक्त पाऊले उचलत आहोत" सध्या कंपनीत मोठ्या बजेट कपातीची तयारी सुरू आहे. विशेष म्हणजे डिजिटल जाहिरातींच्या कमाईत तीव्र मंदी आली आहे. त्यामुळे कंपनीला हे पाऊल उचलावे लागले आहे.

कामावरून काढण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना कंपनीकडून 6 आठवड्यांचा मूळ पगार दिला जाईल. कर्मचाऱ्यांना सहा महिन्यांसाठी आरोग्य सेवेचा खर्च दिला जाईल, असे कंपनीने म्हटले आहे. झुकेरबर्गने मेटाला अधिक भांडवल कार्यक्षम होण्यावर भर दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com