पॅन आधारशी लिंक करा; नाहीतर बसेल 10 हजारांचा दंड

तुम्ही 31 मार्च 2022 पर्यंत पॅन आणि आधार लिंक न केल्यास तुम्हाला 10 हजार रुपये दंड भरावा लागू शकतो.
Pan_Aadhar_Link
Pan_Aadhar_Link
Summary

तुम्ही 31 मार्च 2022 पर्यंत पॅन आणि आधार लिंक न केल्यास तुम्हाला 10 हजार रुपये दंड भरावा लागू शकतो.

आधार कार्ड (Aadhaar card) आणि पॅन कार्ड (PAN card) हे देशातील सर्वात महत्त्वाचे कागदपत्र आहेत. बँकेशी संबंधित सर्व कामांमध्ये या दोन्हींची गरज असते. बँकेत खाते उघडण्यापासून गुंतवणुकीपर्यंत, मुलांच्या शाळेत प्रवेश घेण्यापासून ते घर खरेदी करण्यापर्यंत सगळीकडे या दोन कागदपत्रांचा समावेश आहे. आयकर विभागाच्या नियमांनुसार 31 मार्च 2022 पूर्वी पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करणे अनिवार्य करण्यात आले आहे. तुम्ही 31 मार्च 2022 पर्यंत पॅन आणि आधार लिंक न केल्यास तुम्हाला 10,000 रुपये दंड भरावा लागू शकतो.

Pan_Aadhar_Link
Aadhar Card News : निळं आधार कार्ड कोणाला मिळतं जाणून घ्या!

- तुम्ही तुमचे पॅन कार्ड आधारशी लिंक केले असेल, तर तुम्ही या लिंकवर क्लिक करून तुम्हाला कळू शकते की तुमचे पॅन कार्ड आधारशी लिंक केले आहे की नाही. आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाइट www.incometaxindiaefiling.gov.in वर जा म्हणजेच आता नवीन वेबसाइट https://www.incometax.gov.in/iec/foportal वर जाऊन खाली लिंक आधार (Link Aadhaar) या पर्यायावर क्लिक करा.

- तुमचे स्टेट्स पाहण्यासाठी हायपर लिंकवर क्लिक करा. इथे तुम्हाला तुमचा आधार आणि पॅन कार्डचे डिटेल्स भरावे लागतील.

- तुमचा पॅन आधार क्रमांकाशी लिंक झाला असेल तर तुम्हाला your PAN is linked to Aadhaar Number असे कन्फर्मेशन दिसेल.

- तुम्ही अजुनही आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक केले नसेल, तर तुम्हाला https://www.incometaxindiaefiling.gov.in/home या लिंकवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर आधार लिंकवर क्लिक करा.

- यानंतर तुम्हाला डिटेल्स भरावे लागतील आणि तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केले जाईल.

Pan_Aadhar_Link
आधार कार्ड मदतीने घरबसल्या करा ऑनलाईन KYC; जाणून घ्या पध्दत

एसएमएसद्वारे पॅन कार्ड आधार कार्ड लिंक

- एसएमएस सेवेचा वापर करण्यासाठी, 567678 किंवा 56161 वर मेसेज पाठवून आधारला पॅन कार्डशी लिंक केले जाऊ शकते.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com