Share Market: शेअर बाजारात पडझडीचं सत्र सुरू, सेन्सेक्स 501 अंकानी गडगडला

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजार गडगडला
stock market first day
stock market first day

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजार गडगडल्याचे दिसून येत आहे. शेअर बाजार सध्या घसरणीच्या मार्गावर आहे. 501 अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स 61 हजार 153 च्या पातळीवर आला आहे, तर निफ्टी 155 अंकांनी घसरून 18 हजार 152च्या पातळीवर व्यवहार करत आहे. आज सकाळच्या सत्रात 13 शेअर तेजीत असून 37 शेअर घसरणीसह व्यवहार करत आहेत.

हेही वाचा: Shraddha Walker Case: वेबसीरीज ठरतेय का गुन्ह्यांचं गाइडबुक?

शुक्रवारी सलग दुसऱ्या बाजारात घसरण दिसून आली. व्यवहाराच्या शेवटी निफ्टी 36 अंकांनी घसरून 18308 वर बंद झाला. पण लाल चिन्हावर बंद होऊनही, निफ्टीने 18300 ची महत्त्वपूर्ण पातळी राखण्यात यश मिळविले.

आता जर निफ्टी या पातळीच्या खाली घसरला तर आपण 18100-18000 च्या दिशेने जाताना पाहू शकतो. आणि जर ते 18300 च्या वर राहिला तर 18450-18500 च्या लेव्हलपर्यंत जाऊ शकतो. वीकली टाइम फ्रेमवर, निफ्टीने बियरिश कँडल तयार केली जी स्पिनिंग टॉप फॉर्मेशन सारखी दिसते. जे बाजाराची दिशा स्पष्ट नसल्याचे द्योतक आहे.

stock market first day
Gold Rate : सोने-चांदीच्या दरात आज स्थिरता

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

शॉर्ट टर्म मोमेंटम इंडिकेटर निगेटिव्ह डायव्हर्जन दाखवत आहे, जे बाजारातील आणखी कमजोरी दर्शवत असल्याचे

शेअरखानचे गौरव रत्नपारखी यांचे म्हणणे आहे. शॉर्ट टर्ममध्ये, निफ्टी खाली 18100-18000 च्या दिशेने जाताना पाहू शकतो, तर वरच्या बाजून, निफ्टीचा रझिस्टंस 18450 वर दिसतो. शॉर्ट टर्ममध्ये बाजारात मोठी घसरणही शक्य आहे.

stock market first day
Share Market Opening : बाजार सुरु होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म ?

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

महिन्द्रा अँड महिन्द्रा (M&M)

बजाज ऑटो (BAJAJ-AUTO)

एनटीपीसी (NTPC)

बजाज फायनान्स (BAJFINANCE)

इंडसइंड बँक (INDUSINDBK)

लॉरस लॅब (LAURUSLABS)

टीव्हीएस मोटर्स (TVSMOTOR)

श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स लिमिटेड (SRTRANSFIN)

व्होल्टास (VOLTAS)

भारतीय कंटेनर निगम (CONCOR)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com