खनिज तेलाच्या भावात घसरण 

वृत्तसंस्था
बुधवार, 18 जुलै 2018

टोकियो - खनिज तेलाच्या भावातील घसरण मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी सुरूच राहिली. जागतिक पातळीवर तेल पुरवठ्यातील अडथळे दूर होण्याच्या शक्‍यतेने भावात घसरण नोंदविण्यात आली. खनिज तेलाचा ब्रेंटचा भाव आज प्रतिबॅरल ७१.७२ डॉलरवर आला. भावात सोमवारपासून ४.३ टक्के घसरण झाली आहे. 

नॉर्वेत खनिज तेल क्षेत्रातील कामगारांचा संप सुरू असून, याचा फारसा परिणाम नॉर्वेतील खनिज तेल उत्पादनावर अद्याप झालेला नाही. हा संप मागील मंगळवारपासून सुरू असून, तो आणखी काळ चालल्यास उत्पादनावर परिणाम होण्याची शक्‍यता आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Falling in oil prices