सेन्सेक्‍समध्ये सलग तीन सत्रांत घसरण 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 18 मे 2018

मुंबई : कर्नाटकातील राजकीय घडामोडींचा फटका गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजाराला बसला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स २३८ अंशांची घसरण होऊन ३५ हजार १४९ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीही ५८ अंशांची घट होऊन १० हजार ६८२ अंशांवर बंद झाला.

कर्नाटकमध्ये बी. एस. येडियुरप्पा यांनी आज दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. सर्वोच्च न्यायालयात काल रात्री उशिरा झालेल्या सुनावणीत न्यायालयाने हा शपथविधी थांबविण्यास नकार देत अंतिम सुनावणीनंतर यावर निर्णय देण्यात येईल, असे स्पष्ट केले होते. कर्नाटकातील राजकीय घडामोडींचा परिणाम सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारावर झाला.

Web Title: Falling for three sessions in the Sensex