वाहनचालकांनो फास्टटॅगने केलाय नवीन रेकॉर्ड  

टीम ई-सकाळ
Saturday, 26 December 2020

राष्ट्रीय महामार्ग यांच्यावर टोल भरण्यासाठी लागू करण्यात आलेली फास्टटॅग सिस्टिम चांगलीच लोकप्रिय होत आहे.

राष्ट्रीय महामार्ग यांच्यावर टोल भरण्यासाठी लागू करण्यात आलेली फास्टटॅग सिस्टिम चांगलीच लोकप्रिय होत आहे. आणि त्यामुळेच दररोज फास्टटॅगच्या माध्यमातून टोल भरणाऱ्यांची संख्या देखील वाढत चालल्याचे दिसून येत आहे. सध्या मिळालेल्या माहितीनुसार आता दररोज फास्टॅगमधून 50 लाखाहून अधिक व्यवहार होत आहेत. व त्यामुळे 80 कोटींपेक्षा जास्त देवाण - घेवाण या सिस्टिम द्वारे होत आहे. 

नवीन वर्षापासून मोबाईल ते बँकिंगपर्यंतचे नियम बदलणार; त्याविषयी जाणून घ्या

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) काल प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, डिजिटल फास्टटॅगमुळे आकारण्यात येणार टोल व्यवहार 50 लाखांच्या वर पोहचला आहे. व त्यामुळे दररोज 80 कोटींपेक्षा जास्त  देवाण - घेवाण होत असल्याचे एनएचएआयने आपल्या निवेदनात म्हटले आहे. तर 2.20 कोटीहून अधिक फास्टटॅग आतापर्यंत जारी करण्यात आल्याचे एनएचएआयने नमूद केले आहे. 

एप्रिल महिन्यापासून तुमच्या हातात येणारा पगार होणार कमी  

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राजमार्ग मंत्रालयाकडून नवीन वर्षांपासून सर्व चारचाकी वाहनांसाठी टोल भरण्याकरिता फास्टटॅग अनिवार्य करण्यात येणार आहे. त्यामुळे टोल भरताना फास्टटॅग नसल्यास वाहनचालकांना टोलची दुप्पट रक्कम भरावी लागणार असून, त्यासोबतच अशा वाहनांना थर्ड पार्टी विमा देखील देण्यात येणार नाही. व यामुळे टोलची प्रक्रिया आता संपूर्णपणे डिजिटल होणार असून, टोल प्लाझावरील रोख व्यवहार थांबवले जाणार आहेत.      


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fasttags set a new record on national highways