Share Market : 'या' टेक्सटाईल स्टॉकची शेअर बायबॅकची घोषणा!

हे पर्यायाने भागधारकांना पैसे परत करण्याचा टॅक्स एफीशियंटचा मार्ग मानला जाऊ शकतो.
Share Market
Share Marketsakal
Updated on
Summary

हे पर्यायाने भागधारकांना पैसे परत करण्याचा टॅक्स एफीशियंटचा मार्ग मानला जाऊ शकतो.

Filatex India ने शेअर बायबॅकचा निर्णय घेतला आहे. Filatex India च्या बोर्ड मिटींगमध्ये 59.5 कोटी रुपयांचे शेअर्स बाय बॅक करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. हा बाय बॅक 140 रुपये प्रति शेअर या भावाने केला गेला. कंपनीच्या बोर्ड मिटींगमध्ये कंपनीच्या भागधारकांकडून टेंडर ऑफरद्वारे कंपनीचे 2 फेस व्हॅल्यूचे शेअर्स परत खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. कंपनीने एक्सचेंजला ही माहिती दिली. या बाय बॅकसाठी कंपनीच्या बोर्डाने 8 एप्रिल ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे.

Share Market
SBI च्या शेअर्समध्ये 40टक्के वाढीची शक्यता! तुमच्याकडे आहेत का शेअर्स ?

एखादी कंपनी आपले शेअर्स (Shares) गुंतवणूकदार किंवा भागधारकांकडून खरेदी करते तेव्हा त्याला शेअर बायबॅक (Share buyback) किंवा शेअर पुनर्खरेदी म्हणतात. हे पर्यायाने भागधारकांना पैसे परत करण्याचा टॅक्स एफीशियंटचा मार्ग मानला जाऊ शकतो. लाँग टर्म कॅपिटल गेन्सवर (LTCG) 10 टक्के कर विचारात घेतल्यानंतरही, टॅक्सच्या दृष्टिकोनातून बायबॅक आकर्षक आहे.

सामान्यतः कंपन्या जेव्हा बाजारात मागणी वाढवू इच्छितात तेव्हा शेअर बायबॅक करतात. शेअर बायबॅकमुळे चलनात असलेल्या शेअर्सची संख्या कमी होते, ज्यामुळे शेअरची किंमत आणि प्रति शेअर कमाई (EPS) वाढते. जेव्हा एखादी कंपनी शेअर्स परत विकत घेते तेव्हा ती शेअर्सची संख्या आणि कॅपिटल बेस कमी करते. अशा प्रकारे कंपनीचे EPS आणि ROE सुधारतात.

Share Market
JSPLचे शेअर्स 10 वर्षांच्या उच्चांकावर! 6 दिवसात 16 टक्के वाढ

Filatex India ही भारतातील आघाडीची पॉलिस्टर फिलामेंट यार्न (Polyester Filament Yarn) उत्पादक कंपनी आहे. या कापड कंपनीचे शेअर्स एका वर्षात सुमारे 97 टक्के वाढले आहेत. त्याच वेळी, 2022 मध्ये, हा स्टॉकमध्ये आतापर्यंत 31 टक्के पेक्षा जास्त वाढ झाली आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com