US Federal Reserve interest rate : गुंतवणूकदारांना २.३९ लाख कोटींचा फटका

अमेरिकी फेडरलच्या व्याज दरवाढीचा परिणाम
finance investors loss in lakh crore effect of US Federal interest rate hikes
finance investors loss in lakh crore effect of US Federal interest rate hikesesakal
Updated on

नवी दिल्ली : अमेरिकी फेडरल रिझव्‍‌र्हने व्याजदरवाढ चालूच राहण्याचे संकेत दिल्याने जागतिक शेअर बाजारात नकारात्मक वातावरण निर्माण झाले. त्याचे पडसाद आज भारतीय शेअर बाजारातही जाणवले. विक्रीचा दबाव वाढल्याने सेन्सेक्स ८६१ अंशांनी, तर निफ्टी २४६ अंशांनी गडगडला. दिवसअखेर सेन्सेक्स ५७,९७२ अंशांवर, तर निफ्टी १७,३१२ वर स्थिरावला. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत २.३९ लाख कोटी रुपयांची घट झाली. शुक्रवारी अमेरिकी फेडरलच्या अध्यक्षांनी महागाई नियंत्रणात आणण्यासाठी व्याजदर वाढ सुरू ठेवण्याचे स्पष्ट केले. तसेच रुपयातील घसरण आणि जागतिक कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ यामुळे आज आठवड्याच्या सुरुवातीलाच बाजारात नकारात्मक वातावरण होते.

मुंबई शेअर बाजारात माहिती तंत्रज्ञान, बँकिंग शेअरची जोरदार विक्री झाली. कंपन्यांचे बाजार भांडवल घसरून २,७४,५६,३३० कोटी झाले. दरम्यान, आज रिलायन्स इंडस्ट्रीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत आपले उत्तराधिकारी जाहीर केले. तसेच फाईव्ह-जीसाठी दोन लाख कोटी रुपयांची, तर पेट्रोकेमिकलसाठी पुढील पाच वर्षांत ७५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक जाहीर केली. त्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर घसरले. टेक महिंद्रा, इन्फोसिस, विप्रो, एचसीएल टेक्नॉलॉजीज, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, कोटक महिंद्रा बँक, टाटा स्टील, अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांचे शेअर घसरले; तर मारुती, एशियन पेंट्स, नेस्ले, आयटीसी, महिंद्रा आणि महिंद्रा, हिंदुस्तान युनिलिव्हर या कंपन्यांचे शेअर वधारले.

अर्थव्यवस्थेला धोका निर्माण होण्याची चिंता

अमेरिकेतील दरवाढीमुळे जागतिक अर्थव्यवस्थेला धोका निर्माण होण्याची चिंता वाढली आहे. त्यामुळे बाजारात अधिक अस्थिरता दिसण्याची अपेक्षा असल्याचे कोटक सिक्युरिटीजचे तज्ज्ञ श्रीकांत चौहान यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com