‘सुटे पदार्थ जीएसटीमुक्तच’- अर्थमंत्री निर्मला सीतारामन याचं स्पष्टीकरण

डाळी, कडधान्य, मोहरी, गहू, तांदूळ, ओट्स, पीठ, रवा, बेसन, कॉर्न, मुरमुरे, दही, लस्सी यासह अन्य काही पदार्थ सुट्टे विकले तरी त्यावर पाच टक्के जीएसटी आकारला जाणार नाही
 Finance Minister Nirmala Sitharaman GST-free commodities
Finance Minister Nirmala Sitharaman GST-free commodities sakal

नवी दिल्ली : पंचवीस किलोपेक्षा कमी वजनाच्या वस्तूंवर जीएसटी आकारणीवरून देशभरात नाराजी पसरलेली असताना आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ट्विट करत जीएसटी आकारणीबाबत स्पष्टीकरण दिले. डाळी, कडधान्य, मोहरी, गहू, तांदूळ, ओट्स, पीठ, रवा, बेसन, कॉर्न, मुरमुरे, दही, लस्सी यासह अन्य काही पदार्थ सुट्टे विकले तरी त्यावर पाच टक्के जीएसटी आकारला जाणार नाही, असे स्पष्ट केले.

पॅकिंग केलेले आणि लेबल लावलेले खाद्यपदार्थ आणि अन्नधान्य यांच्यावर पाच टक्के जीएसटी आकारण्याचा निर्णय २८ जून च्या जीएसटी कौन्सिलमध्ये एकमताने घेतला होता. यापूर्वीही अन्नधान्यांवर वेगवेगळे कर लागू होतेच, अशा शब्दांत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या जीएसटीचे समर्थन केले. सुटे अन्नधान्य व खाद्यपदार्थांना जीएसटी लागणार नसल्याबाबत कालच केंद्राने स्पष्ट केले होते आणि त्यांनी आज पुनरुच्चार केला. सीतारामन यांनी विविध ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. डाळी, कडधान्य, मोहरी, गहू, तांदूळ, ओट्स, पीठ, रवा, कॉर्न, बेसन, चुरमुरे, दही, लस्सी आदी पदार्थ सुट्टे विकले, तर त्यावर पाच टक्के जीएसटी लागणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

केंद्र सरकारने सोमवारी दिलेल्या स्पष्टीकरणात हीच बाब स्पष्ट करण्यात आल्याचे सीतारामन यांनी पुनरुच्चार केला. जीएसटी राजवट येण्यापूर्वीही अन्नधान्यांवर कर आकारले जात होते. पंजाब सरकारने धान्यावरील खरेदीकरामार्फत दोन हजार कोटी रुपये कमावले आहेत. तर उत्तर प्रदेश सरकारनेही ७०० कोटी रुपये कमावले आहेत. यापूर्वीही ब्रँडेड पीठ, डाळी, कडधान्ये आदींवर पाच टक्के जीएसटी आकारला जात होता. मात्र त्याचा गैरवापर झाल्याच्या तक्रारी आल्यामुळे आता सरसकट सर्वांवर जीएसटी आकारण्यात येत आहे. मात्र सुट्या गोष्टींवर जीएसटी लागू होणार नाही, याचाही त्यांनी पुनरुच्चार केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com