अर्थमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

टीम ई-सकाळ
Wednesday, 13 May 2020

नवी दिल्ली : स्थानिक ब्रॅन्डला जगभरात ओळख मिळवून देण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. स्वावलंबी भारताचा अर्थ  आत्मविश्वासी भारत असा आहे, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 लाख कोटींचे पॅकज जाहीर केल्यानंतर त्यांनी याचे वाटप कशाप्रकारे होणार याचा लेखाजोखा पत्रकारपरिषदेत मांडला. 

नवी दिल्ली : स्थानिक ब्रॅन्डला जगभरात ओळख मिळवून देण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. स्वावलंबी भारताचा अर्थ  आत्मविश्वासी भारत असा आहे, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 लाख कोटींचे पॅकज जाहीर केल्यानंतर त्यांनी याचे वाटप कशाप्रकारे होणार याचा लेखाजोखा पत्रकारपरिषदेत मांडला. करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्र्यांनी याअगोदर जाहीर केलेलं मदत पॅकेज आणि आरबीआयचे निर्णय यांचाही या २० लाख कोटींच्या पॅकेजमध्ये समावेश असल्याची माहितीही त्यांनी दिली

कोरोनाचा सरकारी कर्मचाऱ्यांना फटका; 16 लाक कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात

- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरिबांना प्राधान्य दिल्याचे सांगत या पॅकेजमध्ये गरिबांसाठी 1 लाख 70 हजार कोटींची तरतूद 

-अर्थसंकल्पानंतर लगेच आपल्यावर कोरोनाचे संकट आले. गरिब कल्याण योजनेत 41 कोटी पैसे थेट खात्यामध्ये जमा केले 

- कोणत्याही गँरेटरशिवाय 3 लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करण्याची तरतूद

-सूक्ष्म, लघु, मध्यम आणिकुटीर उद्योगासाठी 20 हजार कोटींची तरतूद 

 -लॉकडाउनमध्ये रेशन आणि अन्नधान्याचा पुरवठा करण्यात आला

- रेशनिंग कार्ड नाही अशा नागरिकांनाही धान्य देण्याची व्यवस्था केली. 

- सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांसाठी (MSME)  गॅरंटीशिवाय ३ लाख कोटींचं कर्ज उपलब्ध होईल

- 45 लाख MSME उद्योगांना सरकारच्या या निर्णयाचा लाभ मिळेल

- MSME क्षेत्राला कर्जाची परतफेड करण्यासाठी एक वर्ष दिलासा  

-ज्या  MSME चा टर्नओव्हर 100 कोटीपर्यंत आहे त्यांना 25 कोटींपर्यंत कर्ज मिळेल 

-कर्जाची परतफेड करण्यासाठी चार वर्षांचा अवधी 

- MSME परिभाषेत बदल करण्यात आला आहे. 

- 10 कोटी पर्यंतची गुंतवणूक आणि 50 कोटी टर्न ओव्हर असलेल्या उद्योगांना लघू उद्योगात स्थान मिळेल तर  30 कोटींची गुंतवणूक आणि 100 कोटी टर्नओव्हर असलेल्या उद्योगांना मध्यम उद्योगात गणले जाईल  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: finance minister nirmala sitharaman pc package of 20 lakh crores important Points