esakal | Budget 2020 : दुनिया का सबसे प्यारा वतन; अर्थमंत्र्यांनी सादर केली काश्मिरी कविता!
sakal

बोलून बातमी शोधा

Nirmala-Sitharaman-FM

- मेरा वतन तेरा वतन, दुनिया का सबसे प्यारा वतन

Budget 2020 : दुनिया का सबसे प्यारा वतन; अर्थमंत्र्यांनी सादर केली काश्मिरी कविता!

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

अर्थसंकल्प 2020 : नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज आर्थिक वर्ष 2020 साठीचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्प सादर करण्याला सुरवात करण्यापूर्वी त्यांनी एक कविता सादर केली. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अर्थमंत्री सीतारामन यांनी सादर केलेल्या काश्मिरी भाषेतील कवितेचा हिंदी अनुवादही त्यांनी यावेळी वाचून दाखवला. ''हमारा वतन खिलते हुए शालिमार बाग जैसा, हमारा वतन दल झीलमें खिलते हुए कमल जैसा, नौजवानों के गरम खून जैसा, मेरा वतन तेरा वतन, दुनिया का सबसे प्यारा वतन." असे या कवितेचे बोल आहेत.

- भिवविते ‘मंदीछाया’!; यंदाच्या आर्थिक वर्षात व्यापारक्षेत्रात तणावाचे सावट

या काश्मिरी कवितेचे मूळ लेखक पंडित दीनानाथ कौल हे आहेत. पंडित कौल हे पेशाने डॉक्टर होते. तसेच काश्मिरी साहित्यातील प्रसिद्ध साहित्यकारांमध्ये त्यांची गणना केली जाते. सीतारामन यांनी ही कविता सादर करताच सभागृहातील सर्वांनी त्यांना बेंच वाजवत दाद दिली. 

अर्थसंकल्पाला सुरवात करत सीतारामन यांनी देशातील जनतेने दाखविलेल्या विश्वासाबद्दल सर्वांचे आभार मानले. तसेच जनादेशाद्वारे केंद्र सरकार काम करत असून भारतीयांच्या आकांक्षेचा हा अर्थसंकल्प असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

- Budget 2020 : आता हॉटेलपेक्षा बंदुकीचा परवाना मिळणे सोपे...! 

तसेच देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी देशात लागू केलेला जीएसटीचा निर्णय हे ऐतिहासिक पाऊल आहे. आणि दिवंगत अर्थमंत्री अरुण जेटली हे जीएसटीचे खरे शिल्पकार असून त्यांच्या दूरदृष्टीतून कररचनेत आमूलाग्र बदल घडवले, असे मत सीतारामन यांनी यावेळी व्यक्त केले.

- Budget 2020 : अर्थसंकल्पापूर्वीच शेअर बाजारात घसरण