esakal | Budget 2020 : बँकांमधील ठेवी आता आणखी सुरक्षित; मर्यादा 5 लाखांपर्यंत!
sakal

बोलून बातमी शोधा

Nirmala-Sitharaman

"पीएमसी' बॅंकेतील 4 हजार 355 कोटी रुपयांचा गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर विमा संरक्षणाची एक लाख रुपयांची मर्यादा वाढविण्याची मागणी सर्व स्तरातून करण्यात येत होती. 

Budget 2020 : बँकांमधील ठेवी आता आणखी सुरक्षित; मर्यादा 5 लाखांपर्यंत!

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

अर्थसंकल्प 2020 : नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 'बँक डिपॉझिट गॅरंटी' विम्याची मर्यादा एक लाख रुपयांवरून वाढवून पाच लाख केली आहे . 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी (पीएमसी) गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातल्याने ठेवीदार हवालदिल झाले होते. या गैरव्यवहाराचा लक्षावधी ग्राहकांवर परिणाम झाला आहे. 

केंद्र सरकार ठेवींवरील विमा संरक्षणाची मर्यादा 1 लाख रुपयांपेक्षा अधिक करण्यासाठी संसदेत कायदा आणेल, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आधीच दिली होती. 

- आनंद महिंद्रांचं हटके ट्विट; व्हाईट हाऊसला स्नॅक्समध्ये 'समोसा' ठेवावा लागेल!

सध्या व्यक्तिगत खातेदारांसाठी ठेव विम्याची मर्यादा 1 लाख रुपये आहे. आता त्यात वाढ करण्यात आली आहे. ठेव विम्याच्या मर्यादेत 1993 मध्ये वाढ करण्यात आली होती. त्या वेळी ती 30 हजारांवरून एक लाख रुपये करण्यात आली. मात्र, 26 वर्षांत ठेवींवरील विमा संरक्षणाच्या मर्यादेत कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. "पीएमसी' बॅंकेतील 4 हजार 355 कोटी रुपयांचा गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर विमा संरक्षणाची एक लाख रुपयांची मर्यादा वाढविण्याची मागणी सर्व स्तरातून करण्यात येत होती. 

- Budget 2020 : भारताने चीनचा मंत्र अवलंबवावा; बेरोजगारीचे आव्हान मोठे

बँकिंगसंबंधी महत्त्वाचे निर्णय :

- सार्वजनिक क्षेत्रातील १० बँकांचे एकत्रीकरण करण्यात येणार असून त्यातून ४ मोठ्या बँका करण्यात येणार आहे. 
- बँकांसाठी ३.५ लाख कोटींची तरतूद 
- आयडीबीआय बँकेतील हिस्सेदारी विकण्यात येणार आहे 
- भारतीय आयुर्विमा महामंडळातील हिस्सेदारी विकून भांडवल उभारणी करणार

- Budget 2020:बजेट समजणं किटकट वाटतंय? 'हे' 25 मुद्दे समजून घ्या!