वृषभ राशीला गुंतवणुकीसाठी वर्ष चांगले; जाणून घ्या आर्थिक राशीभविष्य

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 20 November 2019

व्यवसाय, उद्योगाच्या दृष्टीने मागील वर्षापेक्षा हे वर्ष समाधानकारक ठरणार आहे. 24 जानेवारी 2020 रोजी शनी मकर राशीमध्ये म्हणजेच आपल्या भाग्यस्थानामध्ये प्रवेश करीत आहे. त्यामुळे मागील वर्षात जी कामे आपण पार पाडू शकला नाहीत, ती या कालखंडात मार्गी लावू शकाल.

व्यवसाय, उद्योगाच्या दृष्टीने मागील वर्षापेक्षा हे वर्ष समाधानकारक ठरणार आहे. 24 जानेवारी 2020 रोजी शनी मकर राशीमध्ये म्हणजेच आपल्या भाग्यस्थानामध्ये प्रवेश करीत आहे. त्यामुळे मागील वर्षात जी कामे आपण पार पाडू शकला नाहीत, ती या कालखंडात मार्गी लावू शकाल. 4 नोव्हेंबर रोजी आठव्या स्थानात जाणारा गुरू फारसा अनुकूल नाही. फक्‍त शनी मात्र 24 जानेवारी 2020 पासून अनुकूल आहे. त्यामुळे परिस्थिती संमिश्र आहे. मात्र, भाग्यातील शनीचा व्यवसायात काही नवीन संधी मिळण्याच्या दृष्टीने फायदा होईल. फक्‍त व्यवसायात नवी संधी, नवीन संपर्क या दृष्टीने ग्रहमान अनुकूल आहे. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

नोकरीतील व्यक्‍तींना हे वर्ष कमी-अधिक प्रमाणात संमिश्र स्वरूपाचे ठरणार आहे. नोकरीमध्ये सुसंधी मिळण्याच्या दृष्टीने 17 ऑक्‍टोबर 2019 ते 4 नोव्हेंबर 2019 व 29 मार्च 2020 ते 28 जून 2020 पर्यंतचा कालखंड ढोबळमानाने चांगला आहे. महिलांना संततिसौख्य, आरोग्य, कौटुंबिक सौख्य, सुसंधी व प्रसिद्धी, सुयश यासाठी 29 मार्च 2020 ते 29 जून 2020 हा कालखंड अत्यंत चांगला ठरणारा आहे. सर्व महत्त्वाचे व्यवहार या कालखंडात करावेत. 

शिवाय 24 जानेवारी 2020 नंतर महत्त्वाचा ग्रह शनी हा आपल्या भाग्यस्थानात येत आहे. त्याच्यामुळे आपली अडलेली कामे मार्गी लागणार आहेत व नवी दिशा सापडणार आहे. गुंतवणुकीसाठी हे संपूर्ण वर्ष चांगले आहे. बाजारपेठेचा अभ्यास करून आपण गुंतवणूक करू शकाल. थोडक्‍यात, या राशीच्या व्यक्‍तींना 24 जानेवारी 2020 पासून नोकरीमध्ये चांगले वातावरण अनुभवायला मिळेल. नवे हितसंबंध निर्माण करू शकाल. तुमच्या अनुभवाच्या कक्षा व्यापक होतील. नवे मार्ग दिसतील. नवी संधी मिळेल. उत्साह व उमेद वाढेल. आगामी कालखंडाकडे आशावादी दृष्टिकोनातून पाहू शकाल.

कसं असेल मेष राशीचं आर्थिक वर्ष?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: financial horoscope for taurus information in marathi