‘एफआयपीबी’ची रु.12,000 कोटींच्या परदेशी गुंतवणूकीस मंजुरी

वृत्तसंस्था
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

नवी दिल्ली: भारतीय गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने(एफआयपीबी) सुमारे 12,200 कोटी रुपयांच्या परदेशी गुंतवणूकीचा मार्ग मोकळा केला आहे. याअंतर्गत, ट्विनस्टार टेक्नॉलॉजीजमुळे भारतात 9,000 कोटी रुपयांची परदेशी गुंतवणूक दाखल होणार आहे. याशिवाय, अपोलो हॉस्पिटल्स आणि हिंदुस्थान एरोनॉटिक्समध्ये अनुक्रमे 750 कोटी रुपये आणि 170 कोटी रुपये गुंतवणूकीस मंजुरी मिळाली आहे.

केंद्रीय अर्थसचिव शक्तिकांता दास यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत परदेशी गुंतवणूकीचे एकुण 24 प्रस्ताव मांडण्यात आले. त्यापैकी 15 प्रस्तावांना हिरवा कंदील मिळाला तर सहा प्रस्ताव बरखास्त करण्यात आले. बरखास्त करण्यात आलेल्या प्रस्तावांविषयी आणखी माहिती मागविण्यात आली आहे.

व्यवसायासाठी आवश्यक असणाऱ्या नियामक प्रक्रियांना वेग देण्यासाठी परदेशी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळ(एफआयपीबी) बरखास्त करण्याची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्पात करण्यात आली होती. थेट परदेशी गुंतवणूकीला चालना देण्यासाठी सर्वच क्षेत्रांमध्ये 90 टक्के परदेशी गुंतवणूक स्वयंचलित मार्गाने येण्याचा मार्ग मोकळा करण्याची घोषणा जेटलींनी केली होती. स्वयंचलित मार्गाने गुंतवणूकीस मंजुरी असणाऱ्या प्रकल्पांना एफआयपीबीच्या मंजुरीची गरज नाही.

Web Title: FIPB clears 15 FDI proposals worth Rs 12,000 crore