esakal | फ्लेक्सिकॅप फंडात गुंतवणूक का?
sakal

बोलून बातमी शोधा

Money

फ्लेक्सिकॅप फंडात गुंतवणूक का?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

फ्लेक्सिकॅप फंड हा इक्विटी म्युच्युअल फंडाचा असा प्रकार आहे, ज्यात विविध बाजारभांडवल असणाऱ्या म्हणजेच लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअरमध्ये गुंतवणूक करण्याची लवचिकता असते. अशा फंडांच्या पोर्टफोलिओच्या एकूण मालमत्तेपैकी किमान ६५ टक्के गुंतवणूक शेअरसंलग्न असणे बंधनकारक आहे. लार्ज; तसेच स्मॉल व मिड कॅप शेअरमध्ये गुंतवणूक असणारी योजना अर्थात ‘फ्लेक्सिकॅप फंडांची’ अंगभूत रचनाच वेगवान धाटणीची असते. अस्थिर बाजाराच्या स्थितीत जोखीम कमी करण्यास आणि मोठ्या आर्थिक आघातांपासून बचावास या फंडातून होणाऱ्या विविधांगी गुंतवणुकीमुळे मदत होते.

व्यापक अर्थाने पाहायचे झाल्यास, ‘फ्लेक्सिकॅप’ फंडाद्वारे निधी व्यवस्थापकांना बाजाराच्या सर्व वर्ग-उपवर्गाच्या तौलनिक आकर्षकतेचा अंदाज घेऊन त्यानुसार गुंतवणुकीचे विभाजन करण्याची मुभा मिळते. म्हणूनच दीर्घ मुदतीचे आर्थिक उद्दिष्ट ठेऊन गुंतवणूक करीत असाल तर तुमच्या पोर्टफोलिओत ‘फ्लेक्सिकॅप फंडा’त काही गुंतवणूक असणे आवश्यक ठरते. शिवाय लार्ज कॅप कंपन्यांमधील वैविध्यपूर्ण गुंतवणुकीमुळे मिड आणि स्मॉल कॅप कंपन्यांशी संबंधित जोखीम कमी करण्यास अथवा जोखमीच्या संतुलनास मदत मिळते.

हेही वाचा: Covishield लस घेतली असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच...

सध्याची बाजाराची स्थिती पाहता, शेअरसंलग्न गुंतवणूक ही फ्लेक्सिकॅप फंडांच्या माध्यमातून ठेवली जाणे अनेकांगाने उपकारक ठरेल. व्यवसायचक्राच्या दृष्टिकोनात पाहिल्यास, भारतीय भांडवली बाजार यापुढेही आकर्षक पातळीवर राहील, असे दिसून येते. अर्थव्यवस्थेची पुनर्उभारी, कंपन्यांच्या मिळकतीत वाढ या सारख्या काही विधायक संकेतांमुळे बाजारातील उत्साही कल कायम राहण्याची अपेक्षा आहे.

हेही वाचा: 'म्युकर'नंतर बोन डेथचं संकट; हाडे होतात कमकुवत

बाजारासाठी प्रतिकूल ठरू शकेल असा एक घटक म्हणजे अमेरिकेतील १० वर्षे मुदतीच्या रोख्यांच्या परतावा दरातील संभाव्य वाढ; तसेच भारतासह, विकसित अर्थव्यवस्थांमध्ये महागाईच्या भडक्याची शक्यता आणि त्या परिणामी जगभरातील मध्यवर्ती बँकांकडून अर्थव्यवस्थेला उत्तेजनाची भूमिका सोडून देऊन कठोर पवित्रा घेतला गेला तर ते बाजारावर नकारात्मक परिणाम करणारे ठरेल. या सर्व घटकांच्या शक्याशक्यतांमुळे बाजारातील अस्थिरतेला आणखीच खतपाणी घातले जाईल. अशा अनिश्चिततेने दाटलेल्या कालावधीत लार्ज कॅप कंपन्यांचा पोर्टफोलिओत समावेश असल्याने फ्लेक्सिकॅप फंडातील घसरणीचे प्रमाण हे कमी राहील आणि पोर्टफोलिओला आवश्यक तरलताही प्राप्त होईल.

हेही वाचा: युती पुन्हा होणार? फडणवीसांचं शिवसेनेबाबत सूचक वक्तव्य, म्हणाले…!

दुसऱ्या बाजूला, वरील शक्यतांच्या उलट सर्व काही सकारात्मक घडत गेल्यास, पोर्टफोलिओतील स्मॉल व मिड कॅप कंपन्या या सर्वांत मोठ्या लाभार्थी ठरतील. पोर्टफोलिओत अशा कंपन्यांच्या समावेशामुळे अर्थव्यवस्थेच्या उभारीच्या काळात त्यांच्या शेअरमध्ये दिसू शकणाऱ्या मूल्यवाढीचा लाभ फंडाला होताना दिसून येईल. आयसीआयसीआय प्रडेन्शियल म्युच्युअल फंडाने गुंतवणूकदारांसाठी ‘फ्लेक्सिकॅप फंडा’ची संधी नुकतीच उपलब्ध केली आहे. आयसीआयसीआय प्रुडेन्शियल फ्लेक्सिकॅप फंडा’ची ही नवी गुंतवणूक योजना (एनएफओ) २८ जूनला सुरू झाली असून, ती १२ जुलै २०२१ पर्यंत गुंतवणुकीसाठी खुली असेल.

(लेखक नीलदीप इन्व्हेस्टमेंट्स- म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्यूटर आहेत.)

loading image
go to top