
फोर्बस 2020 च्या जगातील सर्वाधिक श्रीमंताच्या यादीत बॉलीवूड स्टार अक्षय कुमार हा एकमेव भारतीय आहे. 52 वर्षीय अक्षय कुमार हा सर्वाधिक उत्पन्न असलेला भारतीय सेलिब्रिटी आहे.
फोर्बस या जगविख्यात मासिकाने सर्वाधिक मोबदला घेणाऱ्या श्रीमंत सेलिब्रिटींची यादी जाहीर केली आहे. या यादीत कायली जेनर पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर कायने वेस्टचा नंबर आहे. याशिवाय टेनिसपटू रॉजर फेडरर आणि फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी यांनीदेखील टॉप टेन मध्ये स्थान पटकावले आहे. फोर्बसनुसार जेनरने मागील 12 महिन्यात 59 कोटी डॉलरची कमाई केली आहे. यातील बहुतांश उत्पन्न कायली कॉस्मेटिक्स लाईनमधील हिस्सा विकून मिळवलेले आहे. याआधी काही दिवसांपूर्वी कायली जेनर ही अब्जाधीश राहिली नसल्याचे वृत्त समोर आले होते.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
फोर्बस 2020 च्या जगातील सर्वाधिक श्रीमंताच्या यादीत बॉलीवूड स्टार अक्षय कुमार हा एकमेव भारतीय आहे. 52 वर्षीय अक्षय कुमार हा सर्वाधिक उत्पन्न असलेला भारतीय सेलिब्रिटी आहे. अक्षय कुमारने हॉलीवूड कलाकार विल स्मिथ आणि जेनिफर लोपेस आणि गायिका रिहाना यांना मागे टाकले आहे. अक्षय कुमारचे उत्पन्न 4.85 कोटी डॉलर इतके आहे.
स्टेट बॅंक उभारणार १.५ अब्ज डॉलर, संचालक मंडळाची पुढील आठवड्यात बैठक
फोर्बसच्या यादीतील इतर सेलिब्रिटींनीदेखील घवघवीत उत्पन्न मिळवलेले आहे.
वेस्टचे अंदाजित उत्पन्न 17 कोटी डॉलर इतके आहे. वेस्टने अदिदासच्या यीझी स्निकर ब्रँडसाठी केलेल्या करारातून यातील बहुतांश उत्पन्न मिळालेले आहे. वेस्टनंतर एल्टन जॉनचा क्रमांक आहे. जॉनने 8.1 कोटी डॉलरची कमाई केली आहे. फोर्बसच्या टॉप 100 सेलिब्रिटींनी कर भरण्यापूर्वी एकूण 6.1 अब्ज डॉलरची कमाई केलेली आहे. 2019च्या तुलनेत 2020 यादीत उत्पन्नात 20 कोटी डॉलरची घट झाली आहे. कोरोना महामारीचा तडाखा मनोरंजन आणि क्रिडा क्षेत्राला बसला आहे.