स्टेट बॅंक उभारणार १.५ अब्ज डॉलर, संचालक मंडळाची पुढील आठवड्यात बैठक

वृत्तसंस्था
Thursday, 4 June 2020

फायनान्शियल इन्क्ल्युझन अॅंड मायक्रो मार्केट असे या नव्या विभागाचे किंवा व्हर्टिकलचे नाव आहे. या नव्या व्हर्टिकलअंतर्गत स्टेट बॅंक कृषी आणि कृषीपुरक व्यवसायांसाठी मुख्यत: कर्ज वितरण करणार आहे.

भारतातील सर्वात मोठी बॅंक असलेली स्टेट बॅंक ऑफ इंडिया १.५ अब्ज डॉलरचे भांडवल उभारण्याची शक्यता आहे. एक किंवा अनेक टप्प्यात हे भांडवल उभारले जाणार आहे. यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी ११ जूनला बॅंकेच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षात बॅंक हे भांडवल उभारणार आहे. पब्लिक ऑफर, अमेरिकन डॉलरमधील सिनियर सिक्युअर्ड नोट्सची प्रायव्हेट प्लेसमेंट किंवा इतर कन्व्हर्टीबल चलनाच्या माध्यमातून हे भांडवल उभारले जाण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे २०१९-२० या आर्थिक वर्षातील चौथ्या तिमाहीसाठीचे निकाल उद्या (५ जून) जाहीर केले जाणार आहेत.

याआधी या आठवड्यात स्टेट बॅंकेने मोठी पुनर्रचना करताना, ग्रामीण आणि निमशहरी भागातील ग्राहकांसाठीच्या सेवेत सुधारणा करण्यासाठी एक स्वतंत्र उपक्रम सुरू केला आहे. फायनान्शियल इन्क्ल्युझन अॅंड मायक्रो मार्केट असे या नव्या विभागाचे किंवा व्हर्टिकलचे नाव आहे. या नव्या व्हर्टिकलअंतर्गत स्टेट बॅंक कृषी आणि कृषीपुरक व्यवसायांसाठी मुख्यत: कर्ज वितरण करणार आहे. त्याशिवाय या नव्या उपक्रमाअंतर्गत सूक्ष्म आणि छोट्या व्यवसायांनाही कर्ज पुरवठा केला जाणार आहे, अशी माहिती बॅंकेकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा : बाजार सलग सहाव्या दिवशी चढतीकडे मार्गस्थ

मुडीजने या आठवड्यात स्टेट बॅंक आणि एचडीएफसी बॅंकेसहीत काही इतर बॅंकांच्या पतमानांकनात कपात केली आहे. कोविड-१९ महामारीमुळे अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झालेल्या संकट आणि सोव्हेरन पतमानांकनातील घट हे बॅंकांचे पतमानांकन घटवण्यामागचे मुख्य घटक आहेत. याच आठवड्यात मुडीजने भारताचे पतमानांकन घटवून बीएए३ वर आणले आहे. हे गुंतवणुकीसाठीचे सर्वात खालचे पतमानांकन आहे. २२ वर्षांत पहिल्यांदाच मुडीजने भारताचे पतमानांकन घटवले आहे.

हेही वाचा : अॅमेझॉन, भारती एअरटेलमध्ये २ अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याची शक्यता


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: State bank to raise $1.5 billion