एचडीएफसी बँकेतील परदेशी गुंतवणूकीत मर्यादेत वाढ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2017

एचडीएफसी बँकेचा शेअर उच्चांकी पातळीवर 

मुंबई: परदेशी गुंतवणूकदारांना एचडीएफसी बँकेच्या आणखी शेअर्सची खरेदी करता येणार आहेत. बँकेचे शेअर्स खरेदी करण्यासाठी परदेशी गुंतवणूकदारांवरील असलेली मर्यादा रिझर्व्ह बँकेने(आरबीआय) मागे घेतली आहे. एचडीएफसी बँकेतील परदेशी गुंतवणूक निर्धारित मर्यादेपेक्षा कमी झाल्याने ही बंदी त्वरित मागे घेण्यात आल्याचे आरबीआयने म्हटले आहे.

यासंबंधी घोषणेनंतर एचडीएफसी बँकेच्या शेअरने आज(शुक्रवार)  1450 रुपयांवर 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी गाठली आहे. मुंबई शेअर बाजारात आज बँकेचा शेअर 1439 रुपयांवर उघडला. त्यानंतर, शेअरने 1400 रुपयांवर दिवसभराची नीचांकी तर 1450 रुपयांवर दिवसभराची तसेच वर्षभराची उच्चांकी पातळी गाठली. सध्या(9 वाजून 50 मिनिटे) बँकेचा शेअर 1406.30 रुपयांवर व्यवहार करत असून 78.95 रुपये म्हणजेच 5.95 टक्क्यांनी वधारला आहे.

Web Title: Foreign investors can now buy more HDFC Bank equity