‘फोर सिझन्स रेसिडेन्सी’चा आयपीओसाठी अर्ज

वृत्तसंस्था
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

नवी दिल्ली: हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील कंपनी 'फोर सिझन्स रेसिडेन्सी लि.,'ने प्रारंभिक समभाग विक्रीतून(इनिशिअल पब्लिक ऑफरिंग-आयपीओ) निधी उभारण्यासाठी भांडवली बाजार नियामक 'सेबी'कडे अर्ज सादर केला आहे. प्रस्तावित योजनेत कंपनी एक कोटी शेअर्स म्हणजे 39 टक्के हिस्सेदारीची विक्री करणार आहे.

आयपीओतून मिळालेल्या भांडवलाचा उपयोग हॉटेल उभारण्यासाठी तसेच इतर जनरल कॉर्पोरेट कारणांसाठी वापरला जाणार आहे. याशिवाय, कंपनी सध्या गुजरातमध्ये 'वेस्टिन गांधीनगर' या हॉटेलची स्थापना करीत आहे, असे कंपनी आपल्या डीआरएचपीमध्ये सांगितले आहे.

कंपनीने 'वेस्टिन' या ब्रँडच्या नावाने हॉटेल चालविण्यासाठी गेल्यावर्षी मार्चमध्ये स्टारवूड हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स इंडियासोबत करार केला होता.

Web Title: Four Seasons Residency files IPO papers