इंधनदरातील  घसरण सुरूच

वृत्तसंस्था
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

नवी दिल्ली - इंधनदरात सलग सहा आठवडे सुरू असलेल्या कपातीमुळे दिल्लीत बुधवारी पेट्रोलचा दर प्रतिलिटर ७३.५७ रुपयांवर घसरला. जागतिक पातळीवर खनिज तेलाचा भाव गडगडल्याने ही कपात सुरू असून, एप्रिलनंतर प्रथमच दिल्लीत पेट्रोलचा दर ७४ रुपयांखाली आला.  

दिल्लीत पेट्रोलच्या दरात आज प्रतिलिटर ५० पैसे कपात करण्यात आली. याचबरोबर डिझेलच्या दरात प्रतिलिटर ४० पैसे कपात करण्यात आल्याने तो प्रतिलिटर ६८.८९ रुपयांवर आला. मुंबईत पेट्रोलचा दर आज प्रतिलिटर ७९.१२ रुपये आणि डिझेलचा दर ७१.७१ रुपये होता. सलग सहा आठवड्यांत पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर ९.२६ रुपये आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर ७.२ रुपये कपात झाली आहे. पेट्रोल, डिझेलच्या दरात १८ ऑक्‍टोबरपासून घसरण होत आहे. इंधनदरात १६ ऑगस्टपासून दोन महिन्यांच्या कालवधीत झालेली वाढ आता पूर्णपणे कमी झाली आहे. देशभरात १६ ऑगस्ट ते ४ ऑक्‍टोबर या कालावधीत पेट्रोलचा दर ६.८६ रुपये आणि डिझेलचा दर ६.७३ रुपयांनी वाढला होता.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fuel prices continue to fall

टॅग्स