पेट्रोल, डिझेल सलग तिसऱ्या दिवशी कडाडले

वृत्तसंस्था
Tuesday, 9 June 2020

इंधन दरवाढ करण्याचे पेट्रोलियम कंपन्यांचे धोरण, पेट्रोलियम कंपन्यांनी दरवाढीचा सपाटा लावला असून सलग तिसऱ्या दिवशी वाढ झाली आहे. जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या दर वाढल्यामुळे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी पेट्रोलियम कंपन्यांनी मंगळवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनुक्रमे प्रतिलिटर 54 पैसे 58 पैशांची वाढ झाली आहे.

सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोलियम कंपन्यांनी दरवाढ केली आहे.

  अमेरिका महामंदीच्या विळख्यात अडकण्याची शक्यता

शहर                    पेट्रोल          डिझेल
मुंबई:                   80.01         69.92 

दिल्ली:                 73              71.17

कलकत्ता:              74.98         67.23

चैन्नई:                 77.08         69.74

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
देशात ८३ दिवसांनंतर प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली. जगभरात एप्रिल आणि मे महिन्यात लॉकडाऊन केल्याने इंधनाची मागणी कमी झाली होती. शिवाय या दरम्यान तेलाचे उत्पादन सुरूच असल्याने अतिरिक्त साठा झाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर उणे झाले होते. आता मात्र पुन्हा मागणी वाढल्याने कच्च्या तेलाचे दर 42 डॉलर प्रति बॅरलवर पोचले आहेत.

'टर्म इन्श्युरन्स', आर्थिक नियोजनाचा महत्त्वाचा खांब

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fuel prices rises on third consecutive day