
2 डिसेंबरला गॅस सिलिंडर जवळपास 50 रुपयांनी महाग झाला आहे. यानंतर दिल्लीत घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 644 रुपयांपर्यंत पोहोचली आहे.
नवी दिल्ली - सरकारी तेल कंपन्या आता दर आठवड्याला गॅस सिलिंडरच्या दराची समीक्षा करण्याची तयारी करत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सार्वजनिक तेल कंपन्या यासाठी तयारीला लागल्या आहेत. सध्या गॅस सिलिंडरच्या दराची समीक्षा दर महिन्याला केली जाते. त्यानंतर किंमतीमध्ये वाढ किंवा घट करण्यात येते.
तेल कंपन्यांच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, कंपन्यांना होत असलेलं नुकसान कमी करण्यासाठी हा प्लॅन तयार करण्यात आला आहे. दर महिन्याच्या समीक्षेवेळी दरात घट केल्यानं जवळपास पूर्ण महिन्याचं नुकसान सहन करावं लागायचं. तर नव्या प्लॅननुसार कंपन्यांना मोठा दिलासा मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
हे वाचा - एक हजार कोटींच्या घोटाळा प्रकरणी केंद्रीय मंत्र्यासह 14 जणांना नोटीस
डिसेंबर महिन्यात दोनवेळा गॅस सिलिंडरचे दर वाढले आहेत. त्यामुळे एलपीजी वितरकांचे म्हणणे आहे की, आता दर आठवड्याला सिलिंडरच्या दरात बदल होईल. यामुळे अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचंही त्यांनी सांगितलं.
IOC च्या वेबसाइटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार 2 डिसेंबरला गॅस सिलिंडर जवळपास 50 रुपयांनी महाग झाला आहे. यानंतर दिल्लीत घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 644 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. 1 डिसेंबरला ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी व्यावसायिक गॅसच्या दरात वाढ केली होती. 19 किलो गॅसच्या सिलिंडरचा दर 55 रुपयांनी महाग झाला होता.
हे वाचा - काही शेतकरी संघटनांचे कृषी कायद्याला समर्थन; चर्चेनंतर कृषी मंत्र्यांनी दिली माहिती
दिल्लीत विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या दरातही वाढ झाली आहे. 50 रुपये दरवाढ झाल्यानंतर 594 रुपयांच्या 14.2 किलोग्रॅम गॅस सिलिंडरची किंमत 644 रुपयांवर पोहोचली होती.