Adani Group Row : गेल्या 150 दिवसांत गौतम अदानींना दर सेकंदाला झाले 'एवढ्या' लाखांचे नुकसान

हिंडेनबर्गच्या अहवाला नंतर गौतम अदानी यांची घसरण सुरु झाली.
 Adani Group
Adani Group Sakal

Gautam Adani : 2023 च्या सुरुवातीस, गौतम अदानी हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनण्याची शक्यता वर्तवली जात होती. पण हिंडेनबर्गच्या अहवाला नंतर गौतम अदानी यांची घसरण सुरु झाली. आता ते केवळ टॉप-10 श्रीमंतांच्या यादीतूनच नाही तर टॉप-20 मधूनही बाहेर झाले आहेत.

त्याचबरोबर फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग आता मुकेश अंबानी यांच्यानंतर 13व्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्यांची संपत्ती एका दिवसात 12.5 अब्ज डॉलरने वाढली आहे. तर, अदानी यांना एका दिवसात 10 अब्ज डॉलरहून अधिक नुकसान झाले आहे.

20 जानेवारीनंतरची सर्वात मोठी घसरण :

गौतम अदानी यांच्या संपत्तीत खरी घसरण 21 जानेवारीपासून सुरू झाली. तोपर्यंत हिंडेनबर्गचा अहवाल समोर आला नव्हता.

गौतम अदानी यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली होती, ज्याकडे सर्वजण सामान्यपणे पाहत होते, शेवटच्या ट्रेडिंग दिवसापर्यंत म्हणजेच शुक्रवार 3 जानेवारीपर्यंत, गौतम अदानी यांची एकूण संपत्ती 59 अब्ज डॉलर होती, म्हणजे त्यांनी निम्म्याहून अधिक संपत्ती गमावली होती.

150 दिवसांत 91अब्ज डॉलर्स गमावले

गौतम अदानी यांची संपत्ती 91 बिलियन डॉलरने कमी झाली आहे. आता भारतीय रुपयात बघितले तर सुमारे 7.50 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

 Adani Group
Pan Card News : 13 कोटी लोकांना मोठा धक्का! पॅन कार्ड धारकांसाठी सरकारने जारी केली अधिसूचना

गौतम अदानी यांना चालू वर्षात म्हणजेच 35 दिवसांत 61.6 अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे. म्हणजेच भारतीय रुपयात 5 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

आजपर्यंत आशिया खंडातील कोणत्याही व्यावसायिकाचे इतक्या कमी वेळेत इतके नुकसान झाले नाही. हे आकडे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

हेही वाचा : ढोलेरा- ग्रीनफिल्ड सिटी आणि महाप्रचंड औद्योगिक हब...

अशी सुरू झाली अदानींची पडझड? :

20 सप्टेंबरनंतर गौतम अदानी यांच्या संपत्तीत घसरण दिसून आली. हा तो काळ होता जेव्हा जगभरातील शेअर बाजारांमध्ये घसरणीचा माहोल होता. जगभरातील मध्यवर्ती बँकांव्यतिरिक्त, भारतीय रिझर्व्ह बँक देखील पॉलिसी रेट वाढवत होती.

महागाईचे आकडे जगभरातील सरकारांवर दबाव आणत होते. त्यामुळे शेअर्समध्ये सतत घसरण होत होती आणि इलॉन मस्कपासून बर्नार्ड, जेफ बेझोस आणि उर्वरित अब्जाधीशांच्या संपत्तीवर नकारात्मक परिणाम दिसून येत होते.

गौतम अदानी यांची संपत्तीही कमी झाली आणि 20 ऑक्टोबरपर्यंत ते 125 बिलियन डॉलरच्या जवळ आले. पुढच्या एका महिन्यासाठी म्हणजे 20 नोव्हेंबरपर्यंत त्यांची संपत्ती 130 अब्ज ते 135 बिलियन डॉलरपर्यंत राहिली. पुढे एका महिन्यात थेट 121 अब्ज डॉलरपर्यंत त्यांच्या साम्पातीत घसरण झाली.

150 दिवस आणि प्रति सेकंद 5.77 लाख रुपयांचे नुकसान :

गौतम अदानी यांचे दीडशे दिवसांत मोठे नुकसान झाले आहे. दररोज 50 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. गौतम अदानी यांना दर तासाला 200 कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे.

गौतम अदानी यांचे दर मिनिटाला साडेतीन कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. तर गौतम अदानी यांना प्रत्येक सेकंदाला 5.77 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com