अदानी, अंबानींची 'श्रीमंती'; फेसबुक किंग मार्क झुकेरबर्गला टाकले मागे

मेटा प्लॅटफॉर्म्स इंकचा स्टॉक 26 टक्क्यांनी घसरल्याने मार्क झुकेरबर्गला 31 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे
Gautam Adani Mukesh Ambani Now Richer Then Mark Zuckerberg
Gautam Adani Mukesh Ambani Now Richer Then Mark Zuckerberg

फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गचे बाजार मूल्य घटले आहे. मेटा प्लॅटफॉर्म्स इंकचा स्टॉक 26 टक्क्यांनी घसरल्याने मार्क झुकेरबर्गला (Mark Zuckerberg) 31 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे. त्यामुळे त्याचे जवळपास $251 अब्ज बाजार मूल्य घटले आहे. बाजार मूल्य घटल्याने गौतम अदानी (Gautam Adani) आणि मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी मार्क झुकरबर्गला अब्जाधीशांच्या यादीत मागे टाकले आहे.

Gautam Adani Mukesh Ambani Now Richer Then Mark Zuckerberg
मार्क झुकरबर्ग नेहमी एकसारख्या कपड्यात का दिसतो ?स्वत:च सांगितले कारण

फोर्ब्सच्या रिअल-टाइम अब्जाधीशांच्या यादीत गौतम अदानी हे सर्वात श्रीमंत भारतीय असून त्यांची एकूण संपत्ती सुमारे $90 अब्ज आहे. ते सध्या या यादीत दहाव्या स्थानावर आहे, त्यानंतर मुकेश अंबानी, $89 अब्ज डॉलर्ससह जागतिक स्तरावर अकराव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. तर मार्क झुकेरबर्गला बाराव्या स्थानी स्थान मिळाले आहे. अहवालानुसार, आतापर्यंतचे सर्वात मोठे एका दिवसाचे बाजार मूल्य घटल्याने मार्क झुकरबर्गची एकूण संपत्ती $85 अब्ज झाली आहे. झुकेरबर्गकडे Meta Inc चा अंदाजे 12.8% स्टॉक आहे. तो पूर्वी Facebook या नावाने ओळखला जात होता.

Gautam Adani Mukesh Ambani Now Richer Then Mark Zuckerberg
मुकेश अंबानीच्या बुकलिस्टमधील सर्वोत्तम पाच पुस्तके

अहवालात मिळालेल्या माहितीनुसार, Meta चे एकूण स्टॉक मूल्य 200 अब्ज USD पेक्षा जास्त क्रॅश झाले आहे. ते न्यूझीलंडच्या अर्थव्यवस्थेचा जो आकार आहे त्याच्या अंदाजे समतुल्य प्रमाणात आहे. चौथ्या तिमाहीत, Meta ने 33.67 अब्ज डॉलरची उलाढाल नोंदवली. पण त्यांनी $10.3 अब्ज नफा कमावला आहे. हा नफा गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे 8% कमी आहे. मेटाच्या बाजार मूल्यावर असे मोठ्या प्रमाणात घसरत असताना, अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनी अॅमेझॉनच्या वाढीव कमाईनंतर त्याच्या मूल्यांकनात सुमारे $20 अब्ज भर घातली आहे. बेझोस यांची मालकी 9.9% आहेत आणि सध्या $164 अब्ज कमाई असल्याने ते जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. टेस्ला इंकचे टॉप बॉस एलोन मस्क 232 अब्ज डॉलरसह या यादीत सर्वात पुढे आहेत..

Gautam Adani Mukesh Ambani Now Richer Then Mark Zuckerberg
श्रीमंताच्या यादीत मुकेश अंबानींची घसरण; गौतम अदानी अव्वल स्थानी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com