Gautam Adani : 'पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत वेगाने विकास करत आहे' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gautam Adani

Gautam Adani : 'पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत वेगाने विकास करत आहे'

Gautam Adani on Indian Economy : अदानी समूहाचे संस्थापक आणि अध्यक्ष आणि जगातील अव्वल श्रीमंतांच्या यादीत समाविष्ट असलेले गौतम अदानी यांनी भारतीय अर्थव्यवस्थेबाबत मोठे विधान केले आहे. 2030 पर्यंत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयास येईल, असे त्यांनी म्हटले आहे. यासोबतच ते म्हणाले की, 2050 पर्यंत भारत जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. मुंबईत एका कार्यक्रमात सहभागी होताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. यासोबतच ते म्हणाले की, पुढील 30 वर्षे भारतीय अर्थव्यवस्थेसाठी खूप महत्त्वाची असणार आहेत.

हेही वाचा : महापाषाणयुगीन दगडी स्मारकामध्ये दडल्या आहे समृद्ध संस्कृतीच्या खुणा....

या काळात भारताने उद्योजकतेकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. त्याचबरोबर या प्रवासात भारतातील तरुणांचा सहवासही खूप महत्त्वाचा ठरणार आहे. गेल्या 8 वर्षात भारतीय स्टार्टअप्ससाठी 50 बिलियन डॉलर पर्यंत निधी प्राप्त झाला आहे. अशा परिस्थितीत हे स्टार्टअप भारताच्या विकासाचा वेग मोठ्या प्रमाणात वाढवू शकतात. यासोबतच भारताने हरित ऊर्जेकडेही विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. भारताच्या भविष्यासाठी सौर ऊर्जा आणि हायड्रोजन ऊर्जा या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. यासोबतच भारत 2050 पर्यंत हरित ऊर्जेचा निर्यातदार म्हणून उदयास येईल, असेही ते म्हणाले.

मोदी सरकारचे कौतुक :

यासोबतच गौतम अदानी यांनी केंद्रातील मोदी सरकारचे कौतुक करत पंतप्रधान मोदी (पीएम मोदी) यांच्या नेतृत्वाखाली भारत वेगाने विकासाच्या मार्गावर धावत असल्याचे सांगितले. त्यासोबत ते म्हणाले की, स्वातंत्र्याच्या वेळी भारतीय लोकशाही फार काळ टिकणार नाही, असा विश्वास होता, मात्र गेल्या 75 वर्षांत आपण सशक्त लोकशाहीचे उदाहरण जगासमोर मांडले आहे. आपल्या देशात एका सरकारकडून दुसऱ्या सरकारकडे सत्ता हस्तांतरित करताना कोणतीही अडचण आली नाही. यासोबतच भारताने आपल्या लोकशाही रचनेत अनेक चांगले बदल पाहिले आहेत.

हेही वाचा: Jobs : Meta आणि Twitter कंपन्यांमधून काढलेल्या कर्मचाऱ्यांना TATA ची 'ही' कंपनी करणार मदत

भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल बोलताना गौतम अदानी म्हणाले की, भारतीय अर्थव्यवस्थेला 1 ट्रिलियन डॉलरची पहिली अर्थव्यवस्था होण्यासाठी 58 वर्षे लागली. केवळ 5 वर्षांत 3 ट्रिलियन डॉलर्सचा आकडा गाठला आहे. पुढील 12 ते 18 महिन्यांत भारत 4 ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेपर्यंत पोहोचेल. यासोबतच भारत 2050 पर्यंत 30 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था म्हणून उदयास येईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.