Jobs : Meta आणि Twitter कंपन्यांमधून काढलेल्या कर्मचाऱ्यांना TATA ची 'ही' कंपनी करणार मदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tata

Jobs : Meta आणि Twitter कंपन्यांमधून काढलेल्या कर्मचाऱ्यांना TATA ची 'ही' कंपनी करणार मदत

Jaguar Land Rover : जगावर आर्थिक मंदीचे सावट आहे. त्यामुळे अमेरिकेतील अनेक मोठ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि कॉर्पोरेट कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यास सुरुवात केली आहे. ट्विटर आणि फेसबुकची मूळ कंपनी मेटा सारख्या अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे लोकांसमोर रोजगाराचे संकट निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत भारतातील दिग्गज कंपनी टाटाने अशा कर्मचाऱ्यांना मदतीचा हात पुढे केला आहे. टाटा मोटर्सने ब्रिटीश उपकंपनी जग्वार लँड रोव्हरमध्ये मेटा आणि ट्विटरमधून काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांना नोकरीची ऑफर दिली आहे.

हेही वाचा : महापाषाणयुगीन दगडी स्मारकामध्ये दडल्या आहे समृद्ध संस्कृतीच्या खुणा....

ब्लूमबर्गमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, जग्वार लँड रोव्हर कंपनी जगभरातील मोठ्या टेक कंपन्यांमधून काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांसाठी नोकरीची सुवर्ण संधी उपलब्ध करून देत आहे. आता ट्विटर, मेटा आदी मोठ्या कंपन्यांमधून काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांना विविध विभागांमध्ये नोकरी दिली जाणार आहे. यामध्ये अभियांत्रिकी सेवेसोबतच डिजिटल सेवेत काम करणाऱ्या लोकांचाही समावेश आहे.

टाटा मोटर्सच्या जग्वार लँड रोव्हरने सांगितले की, यामुळे विविध क्षेत्रात काम करणाऱ्या अनेकांना रोजगार मिळेल. कंपनीने आश्वासन दिले आहे की, ती सध्या सुमारे 800 नवीन रोजगार निर्माण करेल. यामध्ये डेटा सायंटिस्ट, मशीन लर्निंग, इलेक्ट्रिफिकेशन, क्लाउड सॉफ्टवेअर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ऑटोनॉमस ड्रायव्हिंग इत्यादीसारख्या अनेक क्षेत्रातील लोकांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. अमेरिका, ब्रिटन, भारत, चीन, हंगेरी, आयर्लंड यांसारख्या अनेक देशांमध्ये 800 लोकांना नोकऱ्या देणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

हेही वाचा: मंदीचे मळभ गडद! 'या' दिग्गज कंपनीच्या संस्थापकाने दिला महागड्या वस्तू न खरेदी करण्याचा सल्ला

यासोबतच भारतातही लवकरच नोकरीच्या संधी निर्माण होणार आहेत. आयफोन निर्माता Apple ने बेंगळुरूमधील होसूर जवळ आपला कारखाना सुरू केला आहे, ज्याद्वारे भारतातील हजारो लोकांना रोजगार उपलब्ध होईल. या प्रकरणाची माहिती देताना दूरसंचार आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की,  देशभरात 60 हजारांहून अधिक लोकांना नोकऱ्या मिळणार आहेत.