जगातील दोन नंबरची श्रीमंती पण तरीही दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर, गौतम अदानी अडचणीत Gautam Adani Loan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gautam Adani

जगातील दोन नंबरची श्रीमंती पण तरीही दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर, गौतम अदानी अडचणीत

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत समावेश असलेल्या गौतम अदानी यांचा अदानी समूह बँकांमधील कर्ज कमी करण्याच्या तयारीत आहे. कंपनीचे कर्ज कमी करण्यासाठी पाच अब्ज डॉलर्सचा निधी उभारण्याची अदानी यांची योजना आहे.

ब्लूमबर्गमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, अदानी समूहाच्या बँकांचे वाढते कर्ज कमी करण्यासाठी अबू धाबी गुंतवणूक प्राधिकरण (Abu Dhabi Investment Authority) आणि मुबादला इन्व्हेस्टमेंट कंपनी (Mubadala Investment Co) या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. तसेच कंपनीने कॅनडा पेन्शन प्लॅन इन्व्हेस्टमेंट बोर्ड आणि कतार इन्व्हेस्टमेंट अथॉरिटीशी चर्चा केली आहे. या सर्व लोकांशी चर्चा करून कंपनीने फंड आणि सॉवरेन वेल्थ फंड बद्दलची माहिती विचारली आहे.

हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार...

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अदानी ग्रुपची प्रमुख कंपनी असलेल्या अदानी एंटरप्रायजेस लिमिटेडने पुढील वर्षापर्यंत 1.8 ते 2.4 अब्ज डॉलर्सचा निधी उभारण्याची योजना आखली आहे. याशिवाय, कंपनीने 25 नोव्हेंबर 2022 रोजी या विषयावर बैठक घेण्याचे देखील ठरवले आहे. यासाठी अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड पुढील वर्षापर्यंत 5 ते 10 अब्ज डॉलर्सचे शेअर्सही जारी करू शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या प्रकरणावर सध्या फक्त अदानी ग्रुपमध्ये चर्चा सुरू आहे.

याआधी, भारतातील दिग्गज उद्योगपती आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत समावेश असलेले मुकेश अंबानी यांनीही रिलायन्स इंडस्ट्रीजवरील बँकेचे कर्ज फेडण्यासाठी 2020 मध्ये 27 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त रक्कम जमा केली होती.

हेही वाचा: Job Cuts :आर्थिक मंदीचा मीडिया कंपन्यांना फटका; कर्मचारी कपातीचे मोठे संकट

मीडिया रिपोर्ट्सनुसार, बँकांनी अदानी ग्रुपला कर्ज कमी करण्यास सांगितले आहे. सप्टेंबर महिन्यात रिसर्च फर्म क्रेडिटसाइट्सने आपल्या अहवालात अदानीच्या कंपन्यांवर निर्धारित किमतींपेक्षा जास्त कर्ज असल्याचे सांगितले होते, परंतु कंपनीने ते नाकारले आणि हे कर्ज सरकारने ठरवून दिलेल्या मानकांमध्येच असल्याचे सांगितले. अशा स्थितीत आता कंपनी आपले शेअर्स विकून येत्या काही दिवसांत 10 अब्ज डॉलर्स जमा करू शकते.