Gautam Adani: अदानी ग्रुपला मोठा झटका! टॉप 10 श्रीमंतांच्या यादीतून बाहेर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gautam Adani Billionaires List

Gautam Adani: अदानी ग्रुपला मोठा झटका! टॉप 10 श्रीमंतांच्या यादीतून बाहेर

Gautam Adani Billionaires: गौतम अदानी यांना जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनण्याची अपेक्षा होती मात्र आता ते जगातील सर्वात श्रीमंत टॉप-10 च्या यादीतून बाहेर पडले आहे.

अमेरिकन इन्व्हेस्टमेंट रिसर्च फर्म आणि शॉर्ट सेलर हिंडेनबर्ग यांच्या अहवालानंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकातील टॉप-10 अब्जाधीशांच्या यादीत गौतम अदानी चौथ्या क्रमांकावरून 11 व्या क्रमांकावर आले आहेत.

या वर्षी, अदानींची मालमत्ता डॉलर 36.1 अब्जने कमी होऊन डॉलर 84.21 अब्ज झाली आहे. अदानी आता ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्समध्ये कार्लोस स्लिमलाही मागे टाकून 11 व्या क्रमांकावर आले आहेत.

अदानी यांच्या पाठोपाठ अंबानी मागे 12 व्या क्रमांकावर आहेत. त्यांची संपत्ती डॉलर 82.2 अब्ज आहे. सर्जी ब्रिन 9 व्या स्थानावर आहे. त्यांची संपत्ती $86.4 अब्ज आहे.

गेल्या वर्षी जगातील टॉप-10 श्रीमंतांच्या यादीत केवळ मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्या संपत्तीत वाढ झाली होती. त्या वर्षी कमाईतही अदानी पहिल्या क्रमांकावर होता.

या वर्षी मुकेश अंबानी,ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सच्या टॉप-10 अब्जाधीशांमधून 12व्या स्थानावर पोहोचले आहेत.

अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी या वर्षी संपत्तीच्या नुकसानीच्या बाबतीत जगातील अब्जाधीशांच्या यादीत अव्वल स्थानावर आहेत, ज्यांनी आतापर्यंत $36.1 अब्ज तोटा झाला आहे.

त्यांच्यानंतर रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचा क्रमांक लागतो. या वर्षात अंबानींना आतापर्यंत 4.96 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे.

टॅग्स :adani group