तिसऱ्या तिमाहीत जीडीपी दर 5.4 टक्के; केंद्र सरकारची माहिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

GDP

आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये जीडीपी दर हा ८.९ टक्के राहील असा अंदाज वर्तवला आहे.

तिसऱ्या तिमाहीत जीडीपी दर 5.4 टक्के; केंद्र सरकारची माहिती

केंद्र सरकारकडून ऑक्टोबर-डिसेंबर २०२१ या तिमाहीच्या जीडीपीची आकडेवारी जारी केली आहे. चालू आर्थिक वर्षात तिसऱ्या तिमाहीत भारताचा जीडीपी दर हा ५.४ टक्के इतका होता. नॅशनल स्टॅटिकल ऑफिस म्हणजचे एनएसओेकडून ही आकडेवारी जारी करण्यात आली आहे. एनएसओने सोमवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या आर्थिक वर्षात याच तिमाहीत जीडीपी वृद्धीदर हा ०.७ टक्के इतका होता. एनएसओने दुसऱ्या अंदाजानुसार, आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये जीडीपी दर हा ८.९ टक्के राहील असा अंदाज वर्तवला आहे.

जानेवारीत जारी करण्यात आलेला अंदाज हा यंदाच्या आर्थिक वर्षात ९.२ टक्के इतका राहील असं सांगण्यात आलं होतं. तर २०२०-२१ मध्ये हाच अंदाज ६.६ टक्के इतका होता. चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर कमी होता. तर दुसऱ्या तिमाहीत जीडीपी दर ८.५ टक्के होता.

हेही वाचा: महाशिवरात्री दिवशी व्यवहार बंद; बुधवारी हे शेअर्स ठरतील फायद्याचं

भारताची वित्तीय तुट ही एप्रिल २०२१ पासून जानेवारी २०२२ या काळात वाढली आहे. आर्थिक वर्ष २०२२ साठीचं ध्येय हे ५८.९ टक्के इतकं झालं आहे. कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंट्सने २८ फेब्रुवारीला जारी केलेल्या आकडेवारीत हे दिसून आलं आहे. एप्रिल-डिसेंबर २०२१ मद्ये वित्तीय तुटीचं पूर्ण वर्षाचं ध्येय हे ५०.४ टक्के इतकं होतं.

Web Title: Gdp Growth 5 4 Percent In Oct Dec 2021 Fy22

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :IndiaeconomyGDP