महाशिवरात्री दिवशी व्यवहार बंद; बुधवारी हे शेअर्स ठरतील फायद्याचं

पुढील ट्रेडिंग सत्रात म्हणजे बुधवारी कोणत्या स्टॉक्समध्ये वाढ होऊ शकते ते जाणून घेऊयात.
share market
share marketSakal
Summary

पुढील ट्रेडिंग सत्रात म्हणजे बुधवारी कोणत्या स्टॉक्समध्ये वाढ होऊ शकते ते जाणून घेऊयात.

महाशिवरात्रीनिमित्त शेअर बाजार (Share Market) मंगळवारी बंद राहील (Share market closed on mahashivratri). या दिवशी BSE आणि NSE वर कोणतेही व्यवहार होणार नाहीत. पुढील ट्रेडिंग सत्रात म्हणजे बुधवारी कोणत्या स्टॉक्समध्ये वाढ होऊ शकते ते जाणून घेऊयात.

share market
केवळ 3.7 रुपयांचा शेअर 20 वर्षात पोहोचला 2424 रुपयांवर...

भारत इलेक्ट्रॉनिक्स (Bharat Electronics)

संरक्षण मंत्रालयाने भारतीय लष्कराच्या T-90 टँकसाठी कमांडर साइटच्या रेट्रो संशोधनासाठी बीईएलसोबत (BEL) करार केला आहे. या कराराची एकूण किंमत 1075 कोटी रुपये आहे. 957 टँकांवर रेट्रो मॉडिफिकेशन करण्यात येणार आहे. कमांडर साईट बीईएल भारत सरकारच्या मेक इन इंडिया उपक्रमाला चांगल्या कामगिरीसह प्रोत्साहन देते. यामुळे देशातील संरक्षण उत्पादनाला चालना मिळेल आणि अशा प्रगत तंत्रज्ञानाच्या निर्यातीसाठी खुले मार्ग उपलब्ध होतील. त्यामुळे भारत इलेक्ट्रॉनिक्सच्या (Bharat Electronics) शेअरवर तुमची नजर असू द्या, असा सल्ला देण्यात येत आहे. सध्या भारत इलेक्ट्रॉनिक्सच्या (Bharat Electronics) शेअरची किंमत 210.30 रुपये आहे. येत्या काळात यात चांगली तेजी दिसू शकते, त्यामुळे बुधवारसाठी या शेअरचा विचार करा असा सल्ला तज्ज्ञ देत आहेत.

share market
शेअर बाजार कोसळला...युद्धाच्या पाचव्या दिवशी सेंसेक्समध्ये ७०० अंकाची घट

झेन टेक्नोलॉजीज (Zen Technologies)

झेन टेक्नोलॉजीज (Zen Technologies) ही जागतिक दर्जाची अत्याधुनिक संरक्षण प्रशिक्षण सोल्यूशन्स, ड्रोन आणि अँटी-ड्रोन सोल्यूशन्स प्रदान करण्यात अग्रणी कंपनी आहे. सुरक्षा दलांच्या लढाऊ परिणामकारकतेचे मूल्यांकन करण्यासाठी प्रशिक्षण प्रणाली विकसित करण्याचा चांगला ट्रॅक रेकॉर्ड आहे. झेन टेक्नोलॉजीजला (Zen Technologies) 13.50 कोटी रुपयांच्या प्रशिक्षण उपकरणांच्या पुरवठ्यासाठी निर्यात करार देण्यात आला आहे. आत्तापर्यंत, कंपनीची एकूण ऑर्डर बुक 428.56 कोटी रुपये आहे. सध्या झेन टेक्नोलॉजीजच्या (Zen Technologies) शेअरची किंमत 198.45 रुपये आहे. ही ऑर्डर बूक पाहता येत्या काळात त्याच्या शेअर्समध्ये मोठी तेजी येण्याचा अंदाज आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com