Share Market: आतापर्यंतची सर्वोत्तम सुरुवात! पहिल्यांदाच सेन्सेक्स 43 हजारांपेक्षा जास्त अंशांनी उघडला

सकाळ ऑनलाईन टीम
Wednesday, 11 November 2020

बिहारच्या निकालानंतर देशातील भांडवली बाजारात मोठी तेजी आली आहे.

मुंबई: बिहारच्या निकालानंतर देशातील भांडवली बाजारात मोठी तेजी आली आहे. आज सत्राच्या सुरुवातीलाचा सेन्सेक्स विक्रमी अंकांनी सुरु झाला. ही एकाद्या सत्राची आतापर्यंतची सगळ्यात उच्चांकी सुरुवात ठरली आहे. आज सेन्सेक्समध्ये 166.04 ची वाढ होऊन 43,444.06 अंकांनी सुरुवात झाली आहे. निफ्टीच्या निर्देशांकमध्ये 81.25 अंशांची वाढ होऊन तो 12712 ने सुरु झाला आहे. निफ्टीत 0.64 टक्क्यांची वाढ दिसली आहे.

मागील सत्रात रेकॉर्ड ब्रेक वाढ-
मागील सत्रात सेन्सेक्स रेकॉर्ड ब्रेक 43 हजारांच्या वर तर निफ्टी निर्देशांक 12,600 अंशापर्यंत गेला होता. विशेष म्हणजे सेन्सेक्समध्ये 500 पेक्षा जास्त अंशांनी वाढ झाली असून तो रेकॉर्ड ब्रेक 43 हजारांच्या पुढे गेला होता. मंगळवारी सेन्सेक्स जवळपास 1.5 टक्क्यांने तर निफ्टी 1 टक्क्याने वाढताना दिसला होता.

Share Market: शेअर मार्केटमध्येही विक्रम, सेन्सेक्स पहिल्यांदाच 43000 पार

जागतिक घडोमोडींचा परिणाम-
अमेरिकेच्या निवडणूक निकालानंतर जगभरातील शेअर मार्केटमध्ये आणि बाजारपेठांत मोठी उलथापालथ दिसत आहे. विशेष म्हणजे अमेरिकेत कोरोनाने कहर केला असून तिथं तिसरी लाट आल्याचे तज्ज्ञांनी मत व्यक्त केलं आहे.  Joe Biden यांच्या विजयानंतर जगभरातील शेअर मार्केटमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे. Nikkei 225, Hang Seng आणि  Moscow Exchange मध्ये वाढ झाली आहे. 

कर्ज घेण्यासाठी सर्वात चांगली संधी, जाणून घ्या व्याजदरातील नवीन बदल

सोने बाजारातही बदल-
अमेरिकच्या निवडणुकीत सत्तांतर झाल्यामुळे सोन्याचे आंतरराष्ट्रीय बाजारातील दर वाढण्याची शक्‍यता आहे. अनेकांनी पन्नास टक्‍के पैसे देऊन ॲडव्हान्स दागिने खरेदी केले. दिवाळीच्या मुहूर्तावर ते दागिने मिळणार आहेत. बागायतदार, सधन मच्छीमारांसह मध्यमवर्गीयांकडून रत्नागिरीत सोने खरेदी सुरू आहे. 

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sensex opens all time high of 43 thousand