esakal | सुधारणा नाहीच : काळ्या पैशांत भारत अजूनही आघाडीवरच; जीएफआय अहवाल

बोलून बातमी शोधा

GFI

काळ्यापैशांची हाताळणी (आकडे अब्ज डॉलरमध्ये) 

  • चीन 457.7 
  • मेक्‍सिको 85.3 
  • भारत 83.5 
  • रशिया 74.8 
  • पोलंड 66.3
सुधारणा नाहीच : काळ्या पैशांत भारत अजूनही आघाडीवरच; जीएफआय अहवाल
sakal_logo
By
पीटीआय

नवी दिल्ली - व्यापारविषयक बेकायदा पैशांच्यासंदर्भात 135 देशांमध्ये भारताचा तिसरा क्रमांक लागतो. भारतात करचुकवेगिरी, मनी लॉंडरिंग पद्धती याद्वारे 83.5 अब्ज डॉलर एवढ्या प्रचंड रकमेचा पैसा वळवला जातो. अमेरिकास्थित ग्लोबल फायनान्शियल इंटेग्रिटी (जीएफआय) या विचारगटाने यासंदर्भातील अहवाल जाहीर केला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जीएफआयनुसार हा बेकायदेशीर पैसा बेकायदा मार्गाने कमावला जातो, हस्तांतरित केला जातो आणि सीमापार पाठवला जातो. या काळ्या पैशाचे प्राथमिक स्रोत हा भ्रष्टाचार, व्यावसायिक करचुकवेगिरी आणि आंतरराष्ट्रीय गुन्हे हे आहेत. अंमली पदार्थांचे तस्कर मनी लॉंडरिंग पद्धतीचा वापर करून अंमली पदार्थांच्या विक्रीसाठी पैसा जुन्या कार आणि इतर वस्तू खरेदी करण्यासाठी वापरतात. या वस्तूंची अंमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या देशांमध्ये निर्यात केली जाते. 

Video : अभिनेत्री म्हणते, 'अभिनंदन, देशात कोरोनाचे आगमन झालंय' 

जीएफआयच्या अहवालाचे नाव "ट्रेड रिलेटेड इलिसिट फायनान्शियल फ्लो इन 135 डेव्हलपिंग कन्ट्रीज : 2008-2017' असे आहे. यात 135 देशांमध्ये पाच देशांमधून काळ्या पैशांची सर्वाधिक हाताळणी होते. चीनमध्ये 457.7 अब्ज डॉलर, मेक्‍सिकोमध्ये 85.3 अब्ज डॉलर, भारतात 83.5 अब्ज डॉलर, रशियात 74.8 अब्ज डॉलर आणि पोलंडमधून 66.3 अब्ज डॉलरच्या एवढ्या काळ्या पैशांची हाताळणी होते. आयात निर्यात करताना चुकीची कागदपत्रे बनवून केल्या जाणाऱ्या व्यापारामुळे मोठा कर चुकवला जातो. यातून सरकारला मोठा महसुली तोटा होतो, असे या अहवालात म्हटले आहे. 

राज्यातील पर्यटकांचा जंगल सफारीकडे वाढता कल

व्यवहारांतील पळवाटा 
आयात आणि निर्यातीतील पळवाटांमुळे हा काळा पैसा एका देशातून दुसऱ्या देशात वळवला जातो. उदाहरणार्थ 2016 मध्ये इक्वेडोर या देशातून दोन कोटी डॉलर मूल्याची केळी अमेरिकेत निर्यात करण्यात आली होती. ही इक्वेडोर सरकारची आकडेवारी आहे. प्रत्यक्षात अमेरिकेच्या अधिकृत आकडेवारीनुसार फक्त 1.5 कोटी डॉलर मूल्याच्याच केळीची आयात झाली होती. आयात निर्यातीच्या या व्यापारात 50 लाख डॉलरची तफावत होती.