गीता गोपीनाथ ‘आयएमएफ’मध्ये रुजू

पीटीआय
बुधवार, 9 जानेवारी 2019

वॉशिंग्टन - म्हैसूरमध्ये जन्मलेल्या गीता गोपीनाथ यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) मुख्य अर्थतज्ज्ञपदाची सूत्रे नुकतीच स्वीकारली. आयएमएफमधील अत्यंत महत्त्वाच्या पदावर वर्णी लागलेल्या त्या पहिल्याच महिला आहेत.

हार्वर्ड विद्यापीठामध्ये प्राध्यापक असलेल्या गोपीनाथ या मागील आठवड्यात मुख्य आर्थिक सल्लागार आणि आयएमएफच्या संशोधन विभागाच्या प्रमुख म्हणून रुजू झाल्या आहेत. जागतिकीकरणाला सध्या मोठ्या प्रमाणात हादरे बसत असून, अनेक देश संकुचित विचारसरणीला आपलेसे करत आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक संस्थांसमोर मोठी आव्हाने निर्माण झालेली आहेत, असे विद्यमान परिस्थितीचे विश्‍लेषण गोपीनाथ करतात.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gita gopinath Join in IMF