‘गोदरेज अॅग्रोवेट’कडून आयपीओच्या प्रक्रियेला वेग

वृत्तसंस्था
शुक्रवार, 10 मार्च 2017

मुंबई: गोदरेज समुहाची उपकंपनी असणार्‍या 'गोदरेज अॅग्रोवेट'ने प्राथमिक समभाग विक्रीची (आयपीओ) प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी कंपनीने आयपीओ व्यवस्थापित करण्यासाठी दोन गुंतवणूक बँकांची निवडीची प्रक्रिया देखील सुरू केली आहे. कंपनी आयपीओच्या माध्यमातून 20 कोटी डॉलर्सचा निधी उभारण्याची शक्यता आहे.

कंपनीने गेल्या आठवड्यात 10हून अधिक परदेशी आणि देशांतर्गत बँकांसोबत बैठकी घेतल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयपीओ व्यवस्थापित करण्यासाठी कोटक बॅंकेची निवड केली आहे. मात्र अद्याप अधिकृतरित्या नाव जाहीर करण्यात आलेले नाही. तसेच अॅक्सिस कॅपिटल आणि क्रेडिट सुसी यांचे नाव देखील शॉर्टलिस्ट करण्यात आले आहे.

गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेडची गोदरेज समुहातील 'गोदरेज अॅग्रोवेट'मध्ये 60.8 टक्के हिस्सेदारी आहे. गोदरेज अॅग्रोवेट कृषी, प्राण्यांचे अन्न पदार्थ, पाम तेल उत्पादन, डेअरी आणि पोल्ट्री या व्यवसायात कार्यरत आहे.

Web Title: Godrej Agrovet kicks off IPO process, hires i-bank