GoFirst आणणार आयपीओ, जुलै-सप्टेंबरपर्यंत होऊ शकतो लाँच | IPO | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IPO
GoFirst आणणार आयपीओ, जुलै-सप्टेंबरपर्यंत होऊ शकतो लाँच | IPO

GoFirst आणणार आयपीओ, जुलै-सप्टेंबरपर्यंत होऊ शकतो लाँच

गोफर्स्ट (GoFirst) या बजेट एअरलाइनचा IPO जुलै-सप्टेंबरपर्यंत येऊ शकतो. यामधून गोफर्स्टची (GoFirst) 3,600 कोटी रुपये उभारण्याची योजना आहे. 27 हून अधिक गुंतवणूकदारांनी GoFirst च्या भांडवल उभारणी योजनेत इंटेरेस्ट दाखवला आहे. कंपनी लवकरच आपल्या योजनेबद्दल गुंतवणूकदारांना प्रेझेंटेशन देणार आहे.

विमान कंपन्यांच्या आंतरराष्ट्रीय उड्डाणावरील बंदी संपुष्टात आली आहे, ज्याचा फायदा मिळू शकतो. कोविड-19 ची नवी लाट येण्याची शक्यता नाही. 'देशांतर्गत हवाई वाहतूक कोविड-19 पूर्वीच्या पातळीवर पोहोचली आहे. त्यामुळे विमान वाहतूक कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे.

हेही वाचा: या स्मॉलकॅप स्टॉकचा 1 वर्षात 1846% परतावा, रेकॉर्ड डेटपूर्वी अपर सर्किटला धडक

इंटरग्लोब एव्हिएशनचा शेअर गेल्या तीन दिवसांत 8.1 टक्क्यांनी वाढला आहे. ही कंपनी इंडिगो या ब्रँड नावाने हवाई सेवा पुरवते. या कालावधीत स्पाइसजेटच्या शेअरमध्ये 7 टक्क्यांची वाढ झाली आहे. तब्बल दोन वर्षांनंतर लोकांनी पुन्हा हवाई प्रवास सुरू केला आहे. मात्र, एव्हिएशन फ्युएलच्या (ATF) किमतीत बरीच वाढ झाली आहे. आगामी काळात विमान कंपन्यांमधील स्पर्धा वाढणार आहे. दोन नवीन विमान कंपन्या सेवा सुरू करणार आहेत.

GoFirst लोकांच्या प्रवासाच्या योजनांवर लक्ष ठेवून आहे. विमान कंपन्यांच्या हितासाठी सरकार लवकरच काही पावले उचलू शकते, असा विश्वास गोफर्स्टने (GoFirst) व्यक्त केला.

हेही वाचा: म्युच्युअल फंडात 100 रुपयांसह सुरु करा गुंतवणूक, देईल चांगला परतावा...

गेल्या वर्षीच्या मे महिन्याच्या तुलनेत एटीएफच्या किमतीत जवळपास 90 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 16 मे रोजी एटीएफची किंमत 5.3 टक्क्यांनी वाढली. ही सलग दहावी वाढ होती. दिल्लीत ATF ची किंमत 1,23,039.71 रुपये प्रति किलोलीटरवर पोहोचली आहे.

GoFirst IPO मधून उभारलेले 2,200 कोटी आपले कर्ज फेडण्यासाठी आणि भाडेतत्त्वावर घेतलेल्या विमानांचे फीस भरण्यासाठी वापरू शकते. बाकी 1,600 कोटी रुपये देश-विदेशातील विमान कंपन्यांच्या सेवा वाढवण्यासाठी वापरण्यात येणार आहेत. इंडोनेशिया, मलेशिया, सिंगापूर, श्रीलंका आणि नेपाळसाठी सेवा सुरू करण्याचा कंपनीचा मानस आहे.

या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत देशांतर्गत प्रवासी वाहतूक कोविड-19 पूर्वीच्या पातळीपेक्षा 5 ते 10 टक्क्यांनी वाढेल असा गोफर्स्टचा विश्वास आहे. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा कोरोनाची नवीन लाट येणार नाही.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Web Title: Gofirst Will Launch An Ipo Which Could Be Launched By July September

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top