मैदानावर जाऊन सामने पाहणे महागणार

वृत्तसंस्था
शनिवार, 1 जुलै 2017

जीएसटी'चा परिणाम क्रीडा क्षेत्रावर विविध पातळ्यांवर पडणार आहे. क्रीडा साहित्य उत्पादन आणि विक्री यातून होणारा परिणाम वेगळा असेल आणि मैदानावर जाऊन सामने पाहण्यासाठी होणारा परिणाम वेगळा असेल. अर्थात, यात मैदानावर जाऊन सामना पाहणे आता सर्व सामान्यांच्या आवाक्‍याबाहेर जाणार आहे. "जीएसटी'मुळे आता सामन्यांच्या तिकिटांवर 28 टक्के कर आकारला जाणार आहे. यामध्ये आयपीएल असेल किंवा प्रो-कबड्डी आणि अगदी हॉकी इंडिया लीग असो या लीगचे सामने मैदानावर जाऊन पाहणे महागडे ठरणार आहे. मोठ्या पारितोषिकाच्या आणि मनोरंजन करणाऱ्या सामन्यांना या अधिकाराखाली आणताना त्यांच्यासाठी 28 टक्के कर निश्‍चित करण्यात आला आहे.

जीएसटी'चा परिणाम क्रीडा क्षेत्रावर विविध पातळ्यांवर पडणार आहे. क्रीडा साहित्य उत्पादन आणि विक्री यातून होणारा परिणाम वेगळा असेल आणि मैदानावर जाऊन सामने पाहण्यासाठी होणारा परिणाम वेगळा असेल. अर्थात, यात मैदानावर जाऊन सामना पाहणे आता सर्व सामान्यांच्या आवाक्‍याबाहेर जाणार आहे. "जीएसटी'मुळे आता सामन्यांच्या तिकिटांवर 28 टक्के कर आकारला जाणार आहे. यामध्ये आयपीएल असेल किंवा प्रो-कबड्डी आणि अगदी हॉकी इंडिया लीग असो या लीगचे सामने मैदानावर जाऊन पाहणे महागडे ठरणार आहे. मोठ्या पारितोषिकाच्या आणि मनोरंजन करणाऱ्या सामन्यांना या अधिकाराखाली आणताना त्यांच्यासाठी 28 टक्के कर निश्‍चित करण्यात आला आहे. मात्र, बीसीसीआय किंवा हॉकी इंडिया यांच्यासारख्या संघटना जेव्हा सामन्यांचे अधिकृत आयोजन करेल (द्विपक्षीय मालिका) किंवा संघटनांच्या ज्या अजिंक्‍यपद स्पर्धा होतील त्यासाठी 18 टक्के कर आकारला जाणार आहे. यामध्ये 250 रुपयापेक्षा अधिक रकमेच्या तिकिटांवर हा कर आकारला जाणार आहे. थोडक्‍यात मैदानावर जाऊन सामने बघायला जाणे आता महागणार आहे. कारण, कुठल्याच सामन्याचे तिकीट 250 रुपयांपेक्षा कमी नसते. सर्वप्रथम सरसकट सर्वांसाठी 28 टक्के कर आकारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, गुरुवारी झालेल्या बैठकीत अजिंक्‍यपद स्पर्धा आणि द्विपक्षीय मालिकांवरील कर दहा टक्‍क्‍यांनी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या लीग चांगल्याच लोकप्रिय होत असून, लीगमधील सामने पाहण्यासाठी अधिका अधिक लोक स्टेडियमवर जातात त्यामुळे येथून अधिक मोठ्या प्रमाणावर महसूल मिळू शकतो, असा अंदाज बांधत सरकारने हा निर्णय घेतला.

क्रीडासाहित्यही महागणार
क्रीडासाहित्य उत्पादनावरही याचा परिणाम होणार असून, आता सर्वसाधारण क्रीडासाहित्यही महागणार आहे. हौस म्हणूनही चेसबोर्ड, कॅरम, फुटबॉल असे खरेदी करणे परवडणार नाही. आतापर्यंत चेसबोर्ड, कॅरम बोर्ड यांच्यावर महाराष्ट्रात व्हॅट आणि सीएसटी धरून आठ टक्के कर आकारण्यात येत होता. "जीएसटी'नंतर हाच कर चार टक्‍क्‍याने वाढणार असून, आता 12 टक्के कर आकारण्यात येईल. क्रिकेट आणि फुटबॉलच्या क्रीडासाहित्यासाठी आतापर्यंत व्हॅट, एक्‍साईज आणि सीएसटी धरून दहा टक्के कर होता. आता तो दोन टक्‍क्‍यांनी वाढून बारा टक्के होईल. व्यायामशाळेतील उपकरणांना सर्वाधिक फटका बसणार असून, त्यामुळे आता जीममध्ये जाणे महागणार आहेत. यासाठीचा कर 15.5 टक्‍क्‍यावरून 28 टक्के करण्यात आला आहे. जिम्नॅस्टिकच्या उपकरणावरील कर देखील 10 टक्‍क्‍यांवरून 28 टक्के करण्यात आला आहे. ऍथलेटिक्‍स साहित्यावरील देखील कर 28 टक्के करण्यात आला आहे. पूर्वी हा 10 टक्के होता. स्पोर्टस वेअर (बूट, ट्रॅकसूट) यांवरील कर कमी करण्यात आला असून, 21.5 टक्‍क्‍यावरून तो 18 टक्के कमी करण्यात आला आहे.

Web Title: Going to the field will be expensive to watch the matches