Gold-Silver Price: सोनं-चांदी झाली स्वस्त; जाणून घ्या आजचे दर

Gold and Silver Price Updates: आज सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे.
Today's Gold Silver Price Today
Today's Gold Silver Price TodaySakal

Gold and Silver Price Today: सोन्याच्या दरांमध्ये सातत्याने बदल होत आहेत. आज म्हणजेच 20 मार्च रोजी देशात सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. देशात 22 कॅरेट 1 तोळा सोन्याची किंमत 47,300 आहे. काल ही किंमत 47,450 होती. म्हणजेच 10 ग्रॅममागे 150 रुपयांची घसरण नोंदवण्यात आली आहे.

24 कॅरेट सोन्याची किंमत-

त्याच वेळी, देशात आज 24 कॅरेट सोन्याचा एक तोळ्याचा भाव 51,600 रुपये आहे. कालच्या दिवशी ही किंमत 51,770 रुपये होती. हे दरांमध्ये GST, TCS आणि इतर शुल्क समाविष्ट नाहीत.

Today's Gold Silver Price Today
Gold-Silver Rate: सोनं झालं स्वस्त! एका तोळ्याचा काय आहे भाव जाणून घ्या

चांदीच्या दरात मोठी घसरण-

चांदीच्या दराबद्दल बोलायचे झाले तर आज एक किलो चांदीचा दर 68,000 आहे. ही किंमत काल 69,000 होती. म्हणजेच चांदीच्या दरात किलोमागे १००० रुपयांची मोठी घसरण दिसून आली आहे.

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी-

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

Today's Gold Silver Price Today
Gold-Silver Price : सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही वाढ!

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

हॉलमार्क (Hallmark)-

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com