Gold Silver Price: सोने-चांदीचे नवे दर जाहीर; जाणून घ्या आजचे दर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Check Today's Gold Price Updates
Gold Silver Price: सोने-चांदीचे नवे दर जाहीर; जाणून घ्या आजचे दर

Gold Silver Price: सोने-चांदीचे नवे दर जाहीर; जाणून घ्या आजचे दर

Gold and Silver Price Today: सोने आणि चांदीचे दरांमध्ये चढउतार होत असतात. आज म्हणजेच 4 एप्रिल रोजी देशात सोन्याच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. देशात 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 47,950 आहे, कालच्या दिवशी ही किंमत प्रतितोळा 47,950 रुपये होती.

२४ कॅरेट सोन्याच्या किमतीत किंचित घट-

देशात 24 कॅरेट सोन्याचा प्रतितोळा भाव आज 52,460 रुपये आहे. कालच्या दिवशी ही ही किंमत 52,480 रुपये होती. त्यामध्ये केवळ 20 रुपयांची घसरण दिसून आली. हे सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात GST, TCS आणि इतर शुल्क समाविष्ट नाहीत. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.

हेही वाचा: Gold-Silver Rate : सराफ बाजारात सोन्याचे भाव घसरले!

चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही-

चांदीच्या दराबद्दल बोलायचे झाले तर चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. आज एक किलो चांदीचा दर 66,800 आहे.

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी-

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

हेही वाचा: Gold-Silver Price Today: गुढीपाडव्याआधी सोनं स्वस्त; जाणून घ्या नवे दर

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

हॉलमार्क (Hallmark)-

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

Web Title: Gold And Silver Price Today 4th April 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top