esakal | Gold Prices: भारतात सोने, चांदीच्या दरात घट; जागतिक बाजारपेठेतील दर स्थिर
sakal

बोलून बातमी शोधा

silver and gold rate

विश्लेषकांच्या मते सोन्याच्या भावात झालेली घसरण याचा अर्थ तो आधीच्या पातळीवर येईल असा होत नाही. सध्या सोने 50 हजार रुपये आणि चांदी 60 हजार रुपयांच्या जवळपास आहे.

Gold Prices: भारतात सोने, चांदीच्या दरात घट; जागतिक बाजारपेठेतील दर स्थिर

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

नवी दिल्ली: सोने-चांदीच्या दरात मागील 4-5 महिन्यांपासून मोठी अस्थिरता दिसली आहे. पण आज भारतीय बाजारपेठेत पुन्हा एकदा घसरलं आहे. सोने चांदीच्या दरात एमसीएक्सवर डिसेंबर फ्युचर्सचे सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम 0.15 टक्क्यांनी घसरन होऊन 50 हजार 550 रुपये झाले. तर चांदीचे दर 0.12 टक्क्यांनी घसरून 61 हजार 868 प्रति किलोपर्यंत गेले आहेत.

मागील सत्रात सोन्याचे भाव 0.1 टक्क्यांनी वाढून 50 हजार 30 रुपये झालं होतं.  तर चांदीचे दर 1 टक्क्यांनी वाढले होते. महत्वाचे म्हणजे 7 ऑगस्टला सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम उच्चांकी 56 हजार 200 रुपयांवर गेले होते. तर चांदीचे दरही प्रतिकिलो 80 हजारापर्यंत गेले होते. त्यानंतर सोने आणि चांदी दोन्हीच्या दरात मोठी घट झाली आहे.

रिलायन्सनंतर आणखी एका भारतीय कंपनीने ओलांडला 10 लाख कोटी बाजारी भांडवलाचा टप्पा

जागतिक बाजारपेठेत गेल्या सत्रात दोन आठवड्यांचा उच्चांक गाठल्यानंतर सोन्याचे भाव स्थिर होते. आतंरराष्ट्रीय बाजारात सोमवारी स्पॉट सोने प्रति औंस 1,912.49 डॉलरवरून 1918.36 डॉलरपर्यंत पोहचले होते. हे दर 22 सप्टेंबरनंतरचे सोन्याचे सर्वोच्च दर ठरले होते.

वाचा सविस्तर -ऑक्टोबर महिन्यात बँकांना 15 दिवस सुट्टी...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सोमवारी व्हाईट हाऊसमध्ये परतल्यानंतर जागतिक सोने बाजारातील धोक्याची संभावना कमी झाली आहे. ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाल्याने जागतिक बाजारपेठेत त्याचा परिणाम दिसला होता. यादरम्यान अमेरिकन डॉलरच्या किंमतीही सौम्य प्रमाणात घसरल्या होत्या.

दिवाळीपर्यंत सोन्याचा भाव किती असेल?
विश्लेषकांच्या मते सोन्याच्या भावात झालेली घसरण याचा अर्थ तो आधीच्या पातळीवर येईल असा होत नाही. सध्या सोने 50 हजार रुपये आणि चांदी 60 हजार रुपयांच्या जवळपास आहे. पुढील काळात ही सोने-चांदीच्या दरात चढउतार होण्याची शक्यता आहे. विश्लेषकांच्या मते दिवाळीपर्यंत सोन्याच्या भावात कोणतीही मोठी वाढ किंवा घसरण होण्याची शक्यता नाही. दिवाळीच्या दिवशीही सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 50 ते 52 हजार रुपये राहू शकतो.