esakal | रिलायन्सनंतर आणखी एका भारतीय कंपनीने ओलांडला 10 लाख कोटी बाजारी भांडवलाचा टप्पा
sakal

बोलून बातमी शोधा

share market

रिलायन्स इंडस्ट्रीजने ही देशातील सध्याची सर्वात जास्त भांडवल असणारी कंपनी आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे सध्याचे बाजार भांडवल 14,95,187.95 कोटी रुपये आहे.

रिलायन्सनंतर आणखी एका भारतीय कंपनीने ओलांडला 10 लाख कोटी बाजारी भांडवलाचा टप्पा

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

नवी दिल्ली: भारतातील तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रसिध्द टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ही कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजनंतरची भारतातील दुसरी सर्वात मोठी भांडवल असणारी कंपनी ठरली आहे. भांडवल बाजारातील टीसीएसची किमंत 10 लाख कोटी रुपयांहून अधिक झालं आहे. याबद्दल टीसीएसने सांगितले होते की, या आठवड्याच्या अखेरीस कंपनीचे शेअर्स परत खरेदी करण्याच्या प्रस्तावावर चर्चा केली जाईल आणि त्यानंतर कंपनीचे शेअर्स सात टक्क्यांहून अधिक वाढले आहेत. बीएसईमधील (Bombay Stock Exchange) टीसीएसचे (Tata Consultancy Services) शेअर्स 7.30 टक्क्यांनी वाढून 2,706.85 रुपयांवर बंद झाले. 

तसेच टीसीएसचे एनएसईवरील (National Stock Exchange ) शेअर्स 7.55 टक्क्यांनी वाढून 2713.95 रुपयांवर बंद झाले. शेअर्सच्या किंमती वाढल्यानंतर बीएसईवरील टीसीएसचे बाजार भांडवल 69,082.25 कोटी रुपयांनी वाढून 10,15,714.25 कोटी रुपये झाले. उच्चांकी 10 लाख कोटी रुपयांचे बाजार भांडवल ओलांडलेली टीसीएस ही देशातील दुसरी भारतीय कंपनी ठरली आहे. यापूर्वी रिलायन्स इंडस्ट्रीजने हा आकडा ओलांडला होता. रिलायन्स इंडस्ट्रीजचे सध्याचे बाजार भांडवल 14,95,187.95 कोटी रुपये आहे. जे देशातील कोणत्याही सूचीबद्ध कंपनीच्या भांडवल्यापेक्षा सर्वाधिक आहे.

वाचा सविस्तर -ऑक्टोबर महिन्यात बँकांना 15 दिवस सुट्टी...

याअगोदर रविवारी टीसीएसने शेअर बाजाराला दिलेल्या नियामक नोटीसमध्ये म्हटले होतं की, कंपनीचे संचालक मंडळ 7 ऑक्टोबर 2020 रोजी झालेल्या बैठकीत शेअर बायबॅकच्या (Buyback ) प्रस्तावावर विचार करेल. संचालक मंडळ कंपनीचे सप्टेंबर तिमाहीतील आर्थिक निकाल आणि दुसरा अंतरिम लाभांश जाहीर करण्याचा ही विचारही करेल. 2018 मध्ये कंपनीने 16 हजार कोटी रुपयांची माघार खरेदी योजनाही लागू केली होती.

सोनं घ्या सोनं! आत्ताच सोने खरेदी करणे ठरू शकतं फायदेशीर

2017 मध्ये कंपनीने असाच शेअर खरेदी कार्यक्रम राबवला. टीसीएसचे शेअर्स परत खरेदी करण्याची ही ऑफर त्याच्या दीर्घकालीन भांडवल वाटप धोरणाचा भाग आहे. या माध्यमातून कंपनी आपली अतिरिक्त रोख रक्कम भागधारकांना परत करत आली आहे.