Gold prices:सोने-चांदीच्या दरात वाढ; दिवाळीच्या मुहूर्तावर खरेदीसाठी गर्दी

सकाळ ऑनलाईन टीम
Monday, 9 November 2020

आंतरराष्ट्रीय बाजारातील बदलांमुळे आज भारतीय बाजारपेठेत सोने, चांदीच्या किंमती वाढल्या आहेत.

नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय बाजारातील बदलांमुळे आज भारतीय बाजारपेठेत सोने, चांदीच्या किंमती वाढल्या आहेत. आज एमसीएक्सवर सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमला 0.16 टक्क्यांनी वाढून 52 हजार 252 रुपये झाले आहे. तर चांदीचा भाव 0.8 टक्क्यांनी वाढून प्रतिकिलोला 65 हजार 880 रुपयांपर्यंत गेला आहे. मागील आठवड्यात सोन्याच्या दरात वाढ दिसली होती, 5 दिवसांत 10 ग्रॅम सोन्याच्या किंमती जवळपास 1500 रुपयांनी वाढल्या होत्या. 

जागतिक बाजारपेठेत डॉलरच्या किंमतीत घट झाल्याने सोन्याचे दर वधारताना दिसत आहेत. स्पॉट सोन्याच्या किंमती 0.2 टक्क्यांनी वाढून 1955.76 डॉलर प्रति औंस झाले आहे, चांदी 0.5 टक्क्यांनी वाढून 25.72 डॉलर प्रति औंस झाले आहे. 

सेन्सेक्स, निफ्टीत उच्चांकी वाढ; Joe Biden यांच्या विजयाने जगभरातील बाजारात तेजी

डॉलरमध्ये घट-
डॉलर निर्देशांक जवळजवळ दोन महिन्यांतील नीचांकी पातळीवर 92.177 आला होता. जर आपण जागतिक बाजारातील परिस्थिती पाहिली तर ज्यावेळेस अमेरिकन डॉलरची किंमत घटते त्यावेळेस इतर चलन असणाऱ्या देशांसाठी सोने स्वस्त होत असते. बऱ्यापैकी सोन्याचे व्यवहार हे डॉलरमध्ये होत असतात. जागतिक स्तरावर भारत हा सोन्याचा मोठा आयातदार देश आहे.

बिग बास्केटच्या 2 कोटी ग्राहकांचा डेटा लीक

31 टक्क्यांनी वाढले दर- 
भारतात 2020 मध्ये जागतिक पातळीनुसार सोन्याच्या किमती 31 टक्क्यांनी वाढल्या आहेत. ऑगस्टमध्ये भारतात सोन्याच्या दराने 56 हजार 200 चा विक्रमी उच्चांक गाठला, तर चांदी प्रति किलो 80 हजारांपर्यंत गेल्या  रुपयांच्या आसपास होती. सणासुदीच्या काळात भारतात सोन्याची मागणी वाढेल अशी आशा विश्लेषकांनी व्यक्त केली. 

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gold and silver prices rates increased in India