esakal | सेन्सेक्स, निफ्टीत उच्चांकी वाढ; Joe Biden यांच्या विजयाने जगभरातील बाजारात तेजी
sakal

बोलून बातमी शोधा

share market incresed

सध्याच्या मोठ्या जागतिक घडामोडींचा परिणाम आज भारतातील शेअर मार्केटवर दिसला आहे

सेन्सेक्स, निफ्टीत उच्चांकी वाढ; Joe Biden यांच्या विजयाने जगभरातील बाजारात तेजी

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

नवी दिल्ली: सध्याच्या मोठ्या जागतिक घडामोडींचा परिणाम आज भारतातील शेअर मार्केटवर दिसला आहे. आठवड्यातील पहिल्या दिवशीच देशातील शेअर बाजारात मोठी तेजी दिसून येत आहे. सेन्सेक्स आणि निफ्टीत विक्रमी वाढ झाली आहे. तब्बल 200 सत्रांनंतर निफ्टीने रेकॉर्ड उच्चांक गाठला आहे. पहिल्या सत्रात आतापर्यंत सेन्सेक्स 42,473 पर्यंत गेला आहे तर निफ्टी 12430.50 पर्यंत जाऊन रेकॉर्ड केला आहे.

शेअर मार्केटमध्ये उसळी-
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आणि अमेरिकेतील निवडणुकीच्या निकालानंतर भारतीय शेअर बाजाराने मोठी उसळी घेतली आहे. आज सेन्सेक्समध्ये 584.09 म्हणजे 1.39 टक्क्यांनी तर निफ्टीत 147.10 म्हणजे 1.20 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

बिग बास्केटच्या 2 कोटी ग्राहकांचा डेटा लीक

शुक्रवारीही बाजारात दिसली तेजी-
यापुर्वी शुक्रवारी भारतीय शेअर बाजारात तेजी दिसली होती. सेन्सेक्समध्ये (BSE SENSEX) 552.90 अंशांनी म्हणजे 1.34  टक्क्यांनी वाढ होऊन 41,893.06 पर्यंत गेला होता. तर निफ्टीत (NIFTY 50) 143.20 अंशांनी म्हणजे 1.18 टक्के वाढून 12,263.50 वर बंद झाला होता.

मारुती सुझुकीची ऑक्टोबरमध्येच दिवाळी!

जागतिक घडोमोडींचा परिणाम-
अमेरिकेच्या निवडणूक निकालानंतर जगभरातील शेअर मार्केटमध्ये आणि बाजारपेठांत मोठी उलथापालथ दिसत आहे. विशेष म्हणजे अमेरिकेत कोरोनाने कहर केला असून तिथं तिसरी लाट आल्याचे तज्ज्ञांनी मत व्यक्त केलं आहे.  Joe Biden यांच्या विजयानंतर जगभरातील शेअर मार्केटमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे. Nikkei 225, Hang Seng आणि  Moscow Exchange मध्ये वाढ झाली आहे. 

(edited by- pramod sarawale)

loading image
go to top