बिग बास्केटच्या 2 कोटी ग्राहकांचा डेटा लीक

सकाळ ऑनलाईन टीम
Monday, 9 November 2020

बीग बास्केट कंपनीने याबद्दलची तक्रार सायबर क्राईम सेलकडे केली आहे

बेंगळूरू: बिग बास्केट ही भारतात किराणा आणि इतर साहित्याच्या विक्रीसाठी प्रसिध्द असणारी कंपनी आहे. आता या कंपनीच्या साईटवर मोठा सायबर हल्ला झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये तब्बल 2 कोटी ग्राहकांची महत्वाची माहिती लीक झाली आहे. सध्या लीक झालेला सगळा डेटा डार्कवेबवर विकला जात आहे. अमेरिकेतील साइबर सिक्युरिटी इंटेलीजन्स फर्म साइबल इंकने ही माहिती दिली आहे. 

महत्वाची माहिती लीक-
साइबलमधील ब्लॉगच्या पोस्टनुसार, जो डेटा लीक झाला आहे त्यामध्ये ग्राहकांची नावं, ईमेल आयडी, पासवर्ड, पिन, संपर्क नंबर, पत्ता, जन्मतारखा, आईपी ऍड्रेस आणि लोकेशन आदी माहिती लीक झाली आहे. 

मारुती सुझुकीची ऑक्टोबरमध्येच दिवाळी!

कंपनीने केली तक्रार-
बीग बास्केट कंपनीने याबद्दलची तक्रार सायबर क्राईम सेलकडे केली आहे. सध्या कंपनीचा डेटा लीक झाल्याची शहानिशा केली जात आहे. कंपनीने या प्रकरणावर माहिती देताना सांगितले आहे की, 'आमच्या ग्राहकांच्या डेटाची सुरक्षा आणि गोपनियता आमची प्राथमिकता आहे. आम्ही ग्राहकांचा फायनेशियल डाटा स्टोअर करत नाही ज्यामध्ये क्रेडिट कार्ड नंबरसह इतर महत्वाची माहिती असते. आम्हाला विश्वास आहे की आमच्या सर्व ग्राहकांचा फायनेंशियल डाटा सुरक्षित आहे.'

Gold Prices: सोने, चांदीच्या दरात बाजारात पुन्हा उसळी

14 ऑक्टोबरला डेटा लीक-
साइबल ब्लॉग पोस्टच्या माहितीनुसार बीग बास्केटच्या ग्राहकांच्या डेटाची चोरी 14 ऑक्टोबरलाच झाली होती. नंतर साइबलने 1 नोव्हेंबरला कंपनीला याबद्दलची माहितीही दिली होती.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bigbasket 2 crore customer data leaked cyber crime