सोनं झालं स्वस्त, चांदीच्या दरात मोठी घसरण

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 23 June 2020

आंतरराष्ट्रीय स्तरावर किंमत कमी झाल्याने आणि डॉलरच्या तुलनेत रुपया वधारल्याने सोने आणि चांदीच्या किंमती कमी झाल्या.

नवी दिल्ली - सोन्याच्या दरात आज पुन्हा घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर किंमत कमी झाल्याने आणि डॉलरच्या तुलनेत रुपया वधारल्याने सोने आणि चांदीच्या किंमती कमी झाल्या. मंगळवारी सोन्याची किंमत 10 ग्रॅममागे 57 रुपयांनी तर चांदीची किंमत प्रती किलोमागे 477 रुपयांनी कमी झाली.  दिल्लीतील सराफ बाजारत मंगळवारी सोन्याचे दर कमी झाल्यानंतर 10 ग्रॅमची किंमत 48 हजार 931 इतकी झाली. 

सोन्यासह चांदीच्या दरातही घसरण झाली. मंगळवारी चांदीचे दर प्रति किलोमागे 477 रुपयांनी कमी झाल्यानंतर एक किलोचा दर 49 हजार 548 इतका झाला. एक दिवस आधी हाच दर 50 हजार 25 रुपये इतका होता. 

सोन्याच्या दरात आणखी वाढ होणार, एका महिन्यात गाठणार उच्चांक

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत सोमवारी एका महिन्यातील उच्चांकी किमतीवर पोहोचली होती. मंगळवारीही यामध्ये भाव वाढत होते. दहा वाजण्याच्या सुमारास स्पॉट गोल्डची किंमत 0.1 टक्क्याच्या वाढीसह 1756.40 डॉलर प्रति औंस इतकी होती. तर यूएस गोल्ड फ्यूचर्ससुद्धा 0.3 टक्के वाढीसह 1771 डॉलर इतकी होती. आंतरराष्ट्रीय बाजारात यावर्षी सोन्याच्या किंमती जवळपास 16 टक्के वाढल्या आहेत. गेल्या महिन्यात साडेसात वर्षांतील उच्चांक मोडला होता.

दागिन्यांच्या निर्यातीत ९० टक्‍क्‍यांहून अधिक घट

वायदे बाजारात सोन्याच्या किंमतीत घसरण झाली. मंगळवारी 0.13 टक्के घसरण होऊन सोनं 47 हजार 881 रुपये प्रती 10 ग्रॅम झालं. एमसीएक्सवर सोन्याच्या ऑगस्ट महिन्यातील किंमतीतही घट होऊन ती 47881 झाली होती. यातील 14059 च्या लॉटचा व्यवहार झाला. सोन्याच्या ऑक्टोंबर महिन्यातील किंमतीतही तेवढीच घसरण झाल्याने 10 ग्रॅमचे दर 48028 इतके होते. यातील 5742 लॉटचे व्यवहार झाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gold and silver rates down in one day