
सोमवारी सोन्याच्या वायदे बाजारातील दरात वाढ झाली असून हा आतापर्यंतचा सर्वाधिक दर आहे.
नवी दिल्ली - देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत चालला असताना सोन्याच्या दरानेही उच्चांक गाठला आहे. सोमवारी सोन्याच्या वायदे बाजारातील दरात वाढ झाली असून हा आतापर्यंतचा सर्वाधिक दर आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत आहे आणि त्याचसोबत भारत चीन यांच्यातही प्रत्यक्ष ताबा रेषेवर तणावाचे वातावरण आहे. यामुळेच सोन्याच्या दरात वाढ झाल्याचे म्हटले जात आहे. जागतिक स्तरावरही सोन्याच्या किंमतीत गेल्या काही काळामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. चीनमधून जगभर पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे अर्थव्यवस्था कोलमडून पडली आहे. दरम्यान, अर्थव्यवस्था पुर्वपदावर येण्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. यामुळेच गुंतवणकदारांनी सुरक्षेच्या दृष्टीने सोन्याकडे मोर्चा वळवला आहे.
दागिन्यांच्या निर्यातीत ९० टक्क्यांहून अधिक घट
एमसीएक्स एक्सचेंजवर 5 ऑगस्ट 2020 च्या सोन्याच्या वायदे बाजारातील भाव जाहीर केला. यामध्ये सकाळी 339 रुपयांची वाढ झाल्यानंतर दहा ग्रॅमची किंमत 48 हजार 276 वर पोहोचली आहे. सोन्याची ही आतापर्यंतची उच्चांकी किंमत आहे. तसेच पाच ऑक्टोबर 2020 च्या सोन्याच्या वायदे बाजाराचा भावही वाढल्याचं दिसून आलं. सोमवारी सकाळी यामध्ये 378 रुपयांची वाढ झाली असून सोन्याचा दर प्रती दहा ग्रॅमला 48 हजार 451 इतका ट्रेंड होत होता.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
ब्लूमबर्गने दिलेल्या माहितीनुसार सोमवारी कॉमेक्सवर सोन्याच्या जागतिक वायदे बाजारातील भाव 0.80 टक्के किंवा 14 डॉलर इतका वाढला. यामुळे सोन्याचा दर प्रती औंस 1767 इतका ट्रेंड होत होता. याचवेळी सोन्याची किंमत 0.47 टक्के म्हणजेच 8.11 डॉलरच्या वाढीसह प्रती औस 1751.98 डॉलरवर पोहोचली होती.
तुम्ही घरखर्चाचे व्यवस्थापन केल्यास तुमचे भविष्य सुरक्षित होईल
एकीकडे सोन्याच्या किंमतीने उच्चांक गाठला असताना चांदीची किंमती वाढली आहे. एमसीएक्सवर सोमवारी सकाळी तीन जुलै 2020 च्या चांदीच्या वायदे बाजाराचा दर 0.99 टक्के किंवा 480 रुपयांच्या वाढीसह ट्रेंड करत होता. यानुसार चांदिचा दर प्रती किलो 49 हजार 116 इतका ट्रेंड़ करत होता. चार सप्टेंबर 2020 च्या चांदीच्या वायदे बाजारातील दर त्यावेळी एमसीएक्सवर 0.99 टक्के किंवा 489 रुपये वाढीसह प्रती किलोग्रॅम 49950 रुपये इतका ट्रेंड करत होता.
प्राप्तीकर विवरणपत्र कोणाला भरता येईल?
जागतिक पातळीवरही सोमवारी सकाळी चांदीच्या दरात वाढ झाल्याचं दिसून आलं. सोमवारी सकाळी चांदीचा वायदे दर कॉमेक्सवर 1.18 टक्के किंवा 0.21 डॉलर इतक्या वाढीसह प्रती औस 18.24 डॉलर इतका ट्रेंड होत होता. याशिवाय चांदीची सध्याच्या जागतिक बाजारातील किंमतीत 1.37 टक्के किंवा 0.24 डॉलर वाढीसह 17.87 डॉलर प्रती औस ट्रेंड करत होती.